नांदेड(प्रतिनिधी)-डी मार्ट शेजारी रस्त्याच्या अर्धवट कामामुळे एका शेजारी एक अशी तीन वाहने खड्ड्यात पडली. सुदैवाने यात काही जीवीत हाणी झालेली नाही.
आज पहाटे 9 वाजेच्यासुमारास कॅनॉल रोड, डी मार्टजवळ ऍटो क्रमांक 4041, कार क्रमांक एम.एच.26 सी.ई.0587 आणि ऍपे ऍटो क्रमांक एम.एच.26 ए.डी.3405 हे तीन वाहन एकानंतर एक या रस्त्यावरील खड्ड्यात पडले आहे. रस्त्याची कामे वेळेत करणे, कोणाला त्यातून अपघात होणार नाही याचे लक्ष ठेवणे ही कंत्राटदाराची जबाबदारी असते. परंतू आपली जबाबदारी झटकवून लवकरात लवकर बिल कसे मिळेल यावर लक्ष केंद्रीत करणाऱ्या गुत्तेदारांनी मात्र अपघात होणार नाही याबाबीवर काहीच लक्ष केलेले नाही असे या अपघातावरून दिसून येते.
रस्त्याच्या अर्धवट कामामुळे तीन वाहने खड्डयात पडली