मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छता रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद

नांदेड(प्रतिनिधी)-मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय व महानगरपालिकाच्यावतीने काढण्यात आलेल्या स्वच्छता रॅलीचे दि. 15 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7.00 वाजता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या शुभहस्ते व आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे,पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता रॅलीस हिरवी झेंडी दाखवून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथून रॅलीची सुरुवात करण्यात आली. सदर रॅली मुथा चौक, कलामंदिर, शिवाजीनगर मार्गे महात्मा ज्योतिबा फुले आय.टी.आय. येथील पुतळा या ठिकाणी सकाळी 9.00 वाजता स्वच्छता रॅलीचा निरोप समारंभ करण्यात आला.
माजी खासदार व्यंकटेश काब्दे यांनी स्वच्छता रॅली चे सुंदर नियोजन केल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले.
निरोप समारंभाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी स्वच्छता रॅलीत सहभागी झालेल्या सर्वांचे विशेष अभिनंदन करून मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्षांच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.या रॅलीत जिल्हाधिकारी कार्यालय ,महानगरपालिका ,पोलीस प्रशासन व शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी , बचत गटाच्या महिला शहरातील विविध शाळेचे विद्यार्थी या स्वच्छता रॅलीत मोठ्या संख्येने उपस्थित होते .शाळेतील विद्यार्थी व बचत गटाच्या महिला यांच्या हातात विविध स्लोगन होते , तसेच रॅलीत विविध वेशभूषा धारण करण्यात आल्या होत्या. सदर रॅलीमध्ये संत गाडगेबाबा महाराज यांचा मनमोहक देखावा तयार करण्यात आला होता.यावेळी राष्ट्रगीत ,राज्य गीत ,मराठवाडा गीताचे शालेय विद्यार्थ्यांनी वाचन केले. स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त कारभारी दिवेकर ,उपायुक्त तथा नोडल अधिकारी निलेश सुंकेवार ,उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे,सहा.नोडल अधिकारी गुलाम मो.सादेक,संजय बेतीवार, बालाजी शिरसिकर यांच्यासह मनपा ,इतर विभागातील अधिकारी कर्मचारी यांची मोठ्या संखेने उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.प्रलोभ कुलकर्णी व आभार मा.अतिरीक्त आयुक्त गिरीश कदम यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *