बाफना टी पॉईंटच्या जागेसाठी भुमाफियांनी जिल्हाधिकारी कार्यालयात वाटलीत हजारो “मोदके’

नांदेड(प्रतिनिधी)-उच्च न्यायालयाने संबंधीत सक्षम अधिकाऱ्याकडे दाद मागण्याची विनंती केल्यानंतर बाफना टी पॉईंटवरील करोडो रुपयांच्या जमीनीबाबत 17 जुलै 2023 रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे देण्यात आलेल्या अर्जाबाबत आजपर्यंत त्या अर्जावर काहीच कार्यवाही झाली नाही. याचा अर्थ जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रत्येक विभागात भुमाफियांनी हजारोंच्या संख्येत “मोदके’ वाटली असतील असा संशय यायला लागला आहे.
गुरूद्वारा बोर्डाच्यावतीने सरदार मनजितसिंघ यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका क्रमांक 7345/2023 दाखल करून गुरूद्वारा बोर्डाची पट्टेदार म्हणून देण्यात आलेली जागा आणि त्याचा आज होणारा व्यवसाय याबाबत दाद मागितली होती. सरदार मनजितसिंघ यांना तत्कालीन प्रशासक डॉ.पी.एस.पसरीचा यांनी या जमीनीबाबत देखरेख करण्याचा अधिकार दिला होता. सरदार मनजितसिंघ गुरूद्वारा बोर्डांच्या अनेक जागांबद्दल न्यायालयात कामकाज पाहतात.
रिट याचिका क्रमांक 7345/2023 बद्दल उच्च न्यायालयाने 11 जुलै 2023 रोजी आदेश करून ही याचिका निकाली काढली होती. त्या आदेशानुसार संबंधीत सक्षम अधिकाऱ्याकडे अर्थात जिल्हाधिकारी नांदेडकडे आम्ही दाद मागणार आहोत.असा अर्ज गुरूद्वारा बोर्डाच्यावतीने मनजितसिंघ यांनी उच्च न्यायालयात दिला होता आणि त्या अर्जाच्या आधारावरच उच्च न्यायालयाने ती याचिका निकाली काढली होती.
उच्च न्यायालयातील याचिका निकाली निघाल्यानंतर 17 जुलै 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात एक अर्ज सरदार मनजितसिंघ यांनी सादर केला. त्या अर्जाच्या प्रति, भुमिअभिलेख अधीक्षक नांदेड, तहसीलदार नांदेड,उपअधीक्षक भुमिअभिलेख नांदेड, मंडळअधिकारी नांदेड, तलाठी नांदेड यांना पण दिल्या होत्या. या सर्व अधिकाऱ्यांमध्ये जिल्हाधिकारी हे सर्वोच्च आहेत. त् यामुळे जोपर्यंंत त्यांच्या कार्यालयातून काही कार्यवाही होणार नाही. तोपर्यंत इतर कोणीच काही करणार नाही हेही तेवढच सत्य आहे.
सरदार मनजितसिंघ हे वास्तव न्युज लाईव्हला सांगत होते की, 17 जुलै रोजी मी अर्ज दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जावून याबाबत विचारणा केली तर प्रत्येक जण ही बाब माझ्या अधिकाराची नाही, हा विभाग कोणाकडे आहे हे माहित नाही अशी उत्तरे देत आहेत. यावरुनच ही करोडो रुपयांची जागा ताब्याज घेणाऱ्या भुमिमाफियांनी हजारोंच्या संख्येत “मोदके’ जिल्हाधिकारी कार्यालयात वाटली असतील म्हणूनच माझ्या अर्जाला कोणी प्रतिसाद देत नाही असे मला वाटत आहे, असे सरदार मनजितसिंघ सांगत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *