नांदेड(प्रतिनिधी)-मराठवाड्याच्या विकासासंदर्भात छत्रपती संभाजीनगर येथे मंत्री मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत मराठवाड्यातील विकासाचा अनुशेष भरुन काढण्याच्या दृष्टीकोणातून प्रत्येक जिल्ह्याने आप-आपल्या जिल्ह्यातील विकासासंदर्भाचा आराखडा सादर केला. मात्र ज्या जिल्ह्याचे पालकत्व ज्या मंत्र्यांनी घेतले आहे. त्या मंत्र्याकडून जिल्ह्याच्या विकासासंदर्भात आणि अधिकच्या मागणी बाबत पालकमंत्र्याकडे आढावा घेणे अपेक्षीत होते मात्र पालकमंत्र्यांनी याकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे जिल्ह्याला पालकमंत्री आहे की नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नांदेड जिल्ह्यातील अनेक प्रश्न मंत्रीमंडळात कित्येक वर्षापासून रेंगाळात पडले आहेत. विशेषत: पोलीस आयुक्तालय, विभागीय महसुल आयुक्तालय यासंदर्भाची मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली जात आहे. मात्र या मागणीला अद्यापही यश आले नाही. विभागीय आयुक्तालयाचा प्रश्न निकाली निघाला होता पण आता तो प्रलंबित आहे. पण पोलीस आयुक्तालयाचे काय? याचबरोबर जिल्ह्यातील अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. सध्या भाजपचे पारडे जिल्ह्यात जड आहे. एकीकडे एक खासदार, चार आमदार आणि मित्र पक्षाचा एक आमदार अशी संख्या असतांनाही पालकमंत्रीच येत नसल्यामुळे हे लोकप्रतिनिधीही हातश झाले आहेत.मराठवाड्यात कित्येक वर्षानंतर मंत्री मंडळाची बैठक पार पडत आहे.या बैठकीत नांदेड जिल्ह्यासाठी काही तरी पदरी पाडून घेण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधी करत असले तरी त्याला पालकमंत्र्यांनी सहमती दाखवली नाही.
विशेषता: पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्ह्याच्या प्रलंबित मागण्या आणि विकासाच्या संदर्भाचा आराखडा पालकमंत्र्यांनी स्वत: घेणे अपेक्षीत होते. सिंचन, कृषी, शैक्षणिक याचबरोबर आरोग्याच्या बाबतीत अनेक विकसात्मक आराखडे प्रलंबित आहेत. नांदेड शहरातील कचरा डेपोचा प्रश्न, सुरक्षेच्या दृष्टीकोणातून सीसीटीव्ही कॅमेरे, याचबरोबर नव्याने प्रस्तावीत असणाऱ्या नांदेड-जालना समृध्दी महामार्ग, रेल्वेच्या संदर्भातील अनेक प्रश्न मागील कित्येक वर्षापासून नांदेड वर्धा हा रेल्वे प्रकल्प आजही अपुर्ण अवस्थेत आहे असे अनेक प्रश्न नांदेडच्या विकासाच्या दृष्टीकोणाने महत्वाचे असले तरी पालकमंत्र्यांनी नांदेडऐवजी आपण जळगावमध्येच असल्याचे दाखवून दिले आहे. यामुळे पालकमंत्री हटाव असाही नारा आता या निमित्ताने विरोधकांकडून होतांना ऐकावयास मिळत आहे.
मंत्रीमंडळाच्या बैठकीत पालकमंत्री महाजन हे नांदेडसाठी कोणता विकास आराखडा सादर करतील