नांदेड(प्रतिनिधी)-14 सप्टेंबर रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास सोमठाणा-पाळज रस्त्यावर 10 ते 12 जणांनी ट्रक चालकाला मारहाण करून, ट्रकचे नुकसान करून त्याच्याकडील 3 हजार 800 रुपये लुटून नेले आहेत.
इरशाद खान ईस्माईल खान रा.बरघाट जि.शिवणी मध्यप्रदेश हा आपला ट्रक क्रमांक एम.एच.40 एन.7517 हा साठापुर येथून घेवून तेलंगणाकडे जात असतांना 14 सप्टेंबरच्या पहाटे 4 वाजेच्यासुमारास त्या रस्त्यावर लोखंडी खिळे असलेल्या पाठ्या टाकून 10 ते 12 जण उभे राहिले त्यामुळे ट्रक थांबला. त्या दरोडेखोरांनी आपल्या हातातील हत्यारांच्या सहाय्याने ट्रकच्या काचा फाडल्या, समोरचे दोन्ही टायर फोडून टाकले आणि चालकाला मारहाण करून त्याच्या खिशातील 3 हजार 800 रुपये बळजबरीने लुटून नेले आहेत.
भोकर पोलीसांनी या तक्ररीनुसार भारतीय दंड संहितेच्या कलम 395, 341, 427 नुसार गुन्हा क्रमांक 328/2023 दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक दिगंबर पाटील अधिक तपास करीत आहेत.
ट्रक चालकाला लुटले