
नांदेड(प्रतिनिधी)-17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन तसेच केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती. आज पोलीस अधिक्षक कार्यालयात तिरंगा ध्वजासह प्रबोधनकार ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले.
आज 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकावण्यात आला. सोबतच श्रीकृष्ण कोकाटे यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाची प्रतिज्ञा सामुहिकपणे वाचन केली. आज केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्मदिन. यानिमित्त पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी लष्करे यांच्यासह कार्यालयातील सर्व विभागांचे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. या कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सुर्यभान कागणे, पोलीस अंमलदार विनोद भंडारे आणि शामका पवा यांनी उत्तमरित्या केले.

