नांदेड(प्रतिनिधी)-कुंटूर ता.नायगाव येथे काही घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 31 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. तसेच मौजे उमरगा शिवारातून विहिरीवर असलेले मोटर स्टाटर आणि केबर अशा स्वरुपांचा 40 हजारांचा ऐवज कोणी तरी चोरट्यांनी चोरून नेला आहे.
कुंटूर येथील रऊफ अल्लाबक्ष कल्यापुरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 17-18 सप्टेंबरच्या रात्री त्यांचे आणि इतरांचे घरफोडून काही अनोळखी चोरट्यांनी त्या सर्व घरांमधून मिळून 1 लाख 31 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ज्यामध्ये रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिणे समाविष्ट आहेत. या कुंटूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक कुसमे अधिक तपास करीत आहेत.
धनाजी तुकाराम केंद्रे, रा.उमरगा (खो) ता .कंधार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 17-18 सप्टेंबर च्या रात्री त्यांच्या शेतशिवाराच्या विहिरीवर लावलेली 7.5 अश्वशक्तीची विद्युत मोटार व 70 फुट केबल वायर असा 40 हजार रुपयांचा ऐवज कोणी तरी चोरुन नेला आहे. कंधार पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार श्रीरामे अधिक तपास करीत आहेत.
कुंटूर येथे अनेक घरे फोडल्याचा एक गुन्हा दाखल