नांदेड(प्रतिनिधी)-आज भाद्रपद चतुर्थी नांदेड शहरात आणि जिल्ह्यात आज जनतेने मोठ्या उत्साहात भगवान श्री.गणेशजी यांच्या मुर्ती सार्वजनिकरित्या आणि आप-आपल्या घरी स्थापीत केल्या. या आनंद सोहळ्यात कोणतीही बाधा येवू नये म्हणून पोलीस मेहनत करत आहेत.
आज भाद्रपद चतुर्थी ही गणेश चतुर्थी म्हणून जगभर साजरी होती. आज भगवान श्री.गणेशजींच्या मुर्त्या सार्वजनिक ठिकाणी आणि घरोघरी प्रस्तापित केल्या जातात. काल दुपारपासूनच बाजारात गणेशमुर्ती पसंद करण्यासाठी गर्दी होती.सोबतच इतर पुजेचे साहित्य खरेदी करण्यात येत होते. आज सकाळपासूनच वाजत-गाजत गणेशमुर्ती आप-आपल्या सार्वजनिक गणेश मंडळांकडे नेण्यात आल्या.जवळपास प्रत्येक हिंदु घरांमध्ये गणेशमुर्तींची स्थापना झाली. दुपारी 12 वाजेनंतर श्री.गणेशजींची पुजा करून जनतेने प्रसादाचे वाटप केले.
श्री.गणेशमुर्ती स्थापनेची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू राहते. गणेशोत्सव सोहळ्यात कोणतेही विघ्न येणार नाही यासाठी पोलीस पुर्णपणे दक्ष आहेत. गणेशमुर्तींचे आगमन आणि रोजची वाहतुक याची जोड लावतांना पोलीसांना परिश्रम घ्यावे लागत आहेत. वृत्त लिहिपर्यंत सुध्दा गणेशमुर्तींचे आगमन सुरूच होते.
श्री.गणेशमुर्तींचे आकार यावर्षी मध्यमस्वरुपाचे दिसत होते. अत्यंत महाकाय अशा मुर्त्या बाजारात दिसल्या नाहीत. काही ठिकाणी पुन्हा एकदा बऱ्याच मोठ-मोठ्या मुर्त्या सार्वजनिक गणेश मंडळांनी स्थापित केल्या आहेत.
गणपती बाप्पा मोरया म्हणत श्री गणेशाचे जोरदार आगमन