संबंधीत व्हिडीओ…
नांदेड(प्रतिनिधी)-आजपासून सुरू झालेल्या गणपती महोत्सवात कोणीही मिठ टाकण्याचा प्रयत्न करेल तर आम्ही तयार आहोत हे दाखवतांना पोलीसांनी बर्की चौक ते राज कॉर्नरपर्यंत पथसंचलन करून तंबी दिली आहे.
आजपासून दहा दिवस चालणाऱ्या गणपती महोत्सवात विविध कार्यक्रम होत असतात. जनतेाल हा महोत्सव अत्यंत प्रिय आहे. या महोत्सवामध्ये अनेक जागी गर्दी होत असते आणि गर्दीचाच फायदा घेवून समाजात विघातकृत्य करणाऱ्यांची इच्छा काही वेगळीच असते. परंतू या महोत्सवातील कार्यक्रमांमध्ये कोणी असा शांततेत मिठ टाकण्याचा प्रयत्न करेल तर आम्ही त्यासाठी सदैव सज्ज आहोत असे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या नेतृत्वात निघालेल्या पथसंचलनाने दाखवून दिले आहे.

पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार ,पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव, सुशिलकुमार नायक, दोन परिवेक्षाधिन पोलीस उपअधिक्षक, पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, जगदीश भंडरवार, संतोष तांबे, मोहन भोसले, नागनाथ आलायने, सुर्यमोहन बोलमवाड यांच्यासह अनेक सहाय्यक पोलीस निरिक्षक, पोलीस उपनिरिक्षक, परिवेक्षाधिन पोलीस उपनिरिक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्रातील महिला आणि पुरूष, क्युआरटी, आरसीपीचे जवान, गृह रक्षक दलाचे जवान व महिला या संचलनात सहभागी झाले होते. जवळपास 500 अधिकारी आणि पोलीस अंमलदार एवढी यांची संख्या असेल.
संचलनाची सुरूवात बर्की चौक इतवारा येथून झाली. त्यानंतर सराफा, किल्ला रोड, गाडीपुरा, जुना मोंढा, गुरुद्वारा चौक, वजिराबाद, शिवाजीनगर, आयटीआय, श्रीनगर ते भाग्यनगर पोलीस ठाणे असे हे पथसंचलन चालत गेले. यत्र योगेश्र्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर:। तत्र श्रीर्विजयो भुतिधुर्रवा नीतिर्मतिर्मम।। नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सुध्दा श्रीकृष्ण आहेत त्यांच्या काळात असे करण्याची हिम्मत कोणी दाखवले असे वाटत नाही. पण गणेशोत्सवात मिठ टाकणाऱ्यांची इच्दा असणाऱ्यांनी हे समजून घेणे आवश्यक आहे की, जिथे योगेश्र्वर आहे, श्रीकृष्ण आहे तिथे विजय निश्चित आहे, का नसणार..? तो सोबतीला उभा राहतो, थोडीफार दिशा दाखवतो, लढायच आपल्यालाच आहे, जो लढेल तो निश्चित जिंकेल. तो सर्वत्र असतो म्हणून हा महोत्सव शांततेतच होणार.


