नांदेड(प्रतिनिधी)-समाजासाठी धोकादायक बनलेल्या एका गुन्हेगाराच्या स्थानबध्दतेत एक वर्षाकरीता वाढ करून त्यास औरंगाबाद कारागृहात मुक्काम वाढ झाली आहे. हे आदेश पोलीसांच्या प्रस्तावानंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जारी केले आहेत.
समाजात काही लोकांमुळे दहत माजते. काही जणांना या दहशतीसाठी स्थानबध्द करण्यात आले होते. यातील एक दिलीप पुंडलिकराव डाकोरे (27) रा.शंभरगाव ता.लोहा ह.मु.रविनगर कौठा याच्याविरुध्द पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशानंतर अनेक पोलीस ठाण्यांनी स्थानबध्दतेचा प्रस्ताव पाठवला. या दिलीप डाकोरेविरुध्द सात प्रकारचे दखल पात्र गुन्हे दाखल आहेत.
महाराष्ट्र जातीय, समाजविरोधी व इतर विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्याचा अधिनियम 1980 (एमपीडीए कायदा)मधील कलम 13 प्रमाणे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी त्यास औरंगाबाद कारागृहात एक वर्षासाठी स्थानबध्द केले आहे.
समाजासाठी धोकादायक असलेल्या दिलीप डाकोरेला औरंगाबाद तुरूंगात स्थानबध्दता