
नांदेड(प्रतिनिधी)-माणुस आपल्या चेहऱ्याने, कपड्यांंनी ओळखला जात नाही. त्यासाठी त्याला स्वत:चे व्यक्तीमत्व तयार करावे लागते. अशाच दमदार व्यक्तीमत्व असलेल्या महामार्ग अपर पोलीस महासंचालक डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांचा जन्मदिन. सन 2007 आणि 2008 मध्ये त्यांनी नांदेमध्ये पोलीस भरती केली होती. त्यावेळच्या सर्व पोलीस अंमलदारांनी मिळून आज अपर पोलीस महासंचालक डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांच्या जन्मदिनी भव्य रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण करून त्यांना जन्मदिनाच्या शुभकामना अशा विशेष प्रकारे प्रेषित केल्या आहेत.
मागील तीन वर्षापासून हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम सुरू आहे. वृत्तलिहिपर्यंत 91 रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले होते.
नांदेड जिल्ह्यात सन 2007-2008 मध्ये डॉ.रविंद्रकुमार सिंगल हे पोलीस अधिक्षक या पदावर कार्यरत होते. पुढे त्यांनी वेगवेगळ्या पदांवर काम करत आज अपर पोलीस महासंचालक महामार्ग सुरक्षा पथक या पदावर कार्यरत आहेत. सन 2007-2008 मध्ये दोन वर्ष पोलीस भरती प्रक्रिया राबवली होती. त्यात जवळपास त्यांनी 400 पोलीस अंमलदार भरती केले होते. काही दिवसांपुर्वी ते नांदेडला आले होते. तेंव्हा या पोलीस अंमलदारांनी त्यांचा सुंदर सन्मान कार्यक्रम आयोजित केला होता.
मागील तीन वर्षापासून दरवर्षी 20 सप्टेंबर रोजी सन 2007-2008 या वर्षी पोलीस झाले सर्व पोलीस अंमलदार मिळून डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांच्या जन्मदिन रक्तदान शिबिर आयोजित करून त्यांना विशेष प्रकारच्या शुभकामना प्रेषित करतात. यावर्षी सन 2007-2008 बॅचचे पोलीस अंमलदार आणि शहरातील पोलीस मित्र यांच्या संयुक्तविद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी श्री.स्वामी समर्थ ब्लड डोनर व सर्व पोलीस अंमलदार यांनी हा कार्यक्रम राबवला. या कार्यक्रमादरम्यान 91 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. याप्रसंगी पोलीस वसाहतीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. म्हणून आपल्या कृतत्वानेच आपले नाव होते हे लिहिणे महत्वाचे आहे. पोलीस भरती पारदर्शकता कशी असावी हे डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांनी सन 2007-2008 ची पोलीस भरती करतांना दाखवून दिले होते. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.रविंद्रकुमार यांच्या भाषेतील उत्कृष्ट नेता असलेले नांदेडचे श्रीकृष्ण कोेकाटे यांनी केले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी पोलीस अंमलदार प्रविण अमिलकंठवाड, दत्ता गायकवाड, संतोष सोनसळे, प्रकाश मामुलवार, अमोल टाक, रंजित नरवाडे यांनी परिश्रम घेवून कार्यक्रम यशस्वी केला. या कार्यक्रमात रक्तदात्यांमधील पाच जणांना आयोजकांकडून लॉटरी पध्दतीने पाच सायकली भेटी देण्यात आल्या.
