नांदेड (प्रतिनिधी)-भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विरोधात बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी ग्रामीण आणि शहर च्या वतीने नांदेड शहरातील आयटीआय चौक येथे दिनांक 20 सप्टेंबर रोजी पडळकर यांना जोडे मारो आंदोलन करून तीव्र निषेध व्यक्त केला भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याविरुद्ध बेताल वक्तव्य केल्यामुळे संपूर्ण दे राज्यात त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जात आहे.
त्या अनुषंगाने नांदेड शहरात आयटीआय चौकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत थेट पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला.
या आंदोलनाच्या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी प्रदेशचे वसंत पाटील सुगावे ग्रामीण जिल्हाध्यक्ष विश्वंभर पवार मनपाचे माजी विरोधी पक्ष नेता जीवन पाटील घोगरे नांदेड ग्रामीण युवकचे जिल्हाध्यक्ष संभाजी पाटील मुकनर शहराध्यक्ष मोहसीन खा पठाण, कन्हैया कदम, कार्याध्यक्ष माधव पाटील चिंचाळे, कंधारचे युवक अध्यक्ष माधव पाटील, कदम नायगाव अध्यक्ष माधव पाटील बेंद्रीकर, धर्माबाद युवकचे अध्यक्ष नागेंद्र पाटील कदम, यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.
भाजपच्या नेत्यांनी पडळकरांवर अंकुश ठेवावा
संभाजी पाटील मुकनर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बद्दल केलेले बेताल वक्तव्य राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस कदापि सहन करणार नाही गोपीचंद पडळकर यांनी माफी मागावी पडळकर यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही केवळ ते समाजाचे दिशाभूल करू पाहत आहेत त्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाचे भांडवल करू नये भाजपच्या नेत्यांनी अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्यावर अंकुश ठेवावा अन्यथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस अधिक तीव्र आंदोलन करेल असे मत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष संभाजी पाटील मुकनर यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन