नांदेड (प्रतिनिधी)-महानगरपालिका नांदेडच्या स्वच्छता विभागामार्फत स्वच्छता- हि सेवा इंडीयन स्वच्छता लीग 2.0 अंतर्गत आज दि. 20 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7 ते सकाळी 9कालावधीत शहरातील डॉक्टलेन भागात आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांच्या शुभहस्ते विशेष स्वच्छता मोहिमेची सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी खासदार डॉ. व्यकंटेश काब्दे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शहरातील डॉक्टरलेन भागातील कदम हॉस्पीटल पासुन या विशेष स्वच्छता मोहिमेची सुरुवात करण्यात आली. सर्व परिसरात साफसफाई करण्यात आली. स्वच्छ शहर सुंदर शहर, हरित शहर नांदेड शहर अशा घोषणांनी परिसर दणाणुन गेला.
सदर डॉक्टर लेन परिसरातील रॅंलीच्या मार्गात येणा-या व्यावसायीक दुकाने, लहान मोठे खाद्य विक्रेते, हॉटेल व्यावसायीक यांनी रस्त्यावर कचरा न टाकता आपल्या व्यावसायाच्या ठिकाणी डस्टबिन ठेवावा त्याचा वापर करावा, जमा झालेला कचरा महानगरपालिकेच्या घंटागाडीत सुका व ओला करून वेगवेगळा द्यावा, प्लॉस्टिकचा वापर करु नये असे रॅंलीस सहभागी झालेल्या मान्यवरांच्या वतीने प्रबोधन करण्यात आले.विशेष स्वच्छता मोहिमेचा शेवट भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ करण्यात आला. आयुक्त यांनी शहरातील सर्व स्वच्छता प्रेमी नागरिकांनी महापालिकेच्या वतीने आयोजित विशेष स्वच्छते मोहिमेत स्वयस्फुर्तीने सहभाग नोंदवावा असे आवाहन यावेळी केले.या स्वच्छता रॅलीस उपायुक्त (स्वच्छता) निलेश सुकेवार, आरोग्य विभाग प्रमुख अजितपालसिंघ संधु, नागरिक कृती समिती नांदेडचे कॉमेड के. के. जांबकर, अँड धोंडीबा पवार, प्रॉं. डॉ. लक्ष्मण शिंदे, डॉ. सुनिल कदम, डॉ. नारलावार, डॉ. कर्मवीर यांच्यासह सहाय्यक आयुक्त ( स्वच्छता) गुलाम मो. सादेख, क्षेत्रीय अधिकारी डॉ. मिर्झा फरतुल्लाह बेग, यांच्यासह मनपा वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन, डॉ.म. बदीयोद्दीन,डॉ. बळीराम भुरके, प्रतिष्ठित नागरिक, महिला यांच्यासह आरोग्य, स्वच्छता व ईतर विभागातील कर्मचारी, यांची उपस्थिती होती.तसेच महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागामार्फत स्वच्छता हि सेवा विशेष स्वच्छता मोहिमे अंतर्गत दि 21 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7 ते सकाळी 9 यावेळेत गोदावरी नदी घाटावर घाट परिसर विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे.उक्त गोदावरी नदी घाट परिसर स्वच्छता अभियानात शहरातील सर्व वयोगटातील स्वच्छता प्रेमी नागरिक आदींनी महानगरपालिकेच्या वतीने आयोजित उपरोक्त अभियानात स्वंयस्फुर्तीने सहभागी नोंदवावा. तरी स्वच्छता हि सेवा अंतर्गत आयोजित विविध ठिकाणांच्या सर्व स्वच्छता अभियानात जास्तीत जास्त संखेने सहभागी होवुन अभियान यशस्वी करण्यास व नांदेड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या संकल्पना पुर्ण करण्यास सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त (स्वच्छता) निलेश सुकेवार यांनी केले आहे.
शहर स्वच्छ व सुंदर शहर या संकल्पनेत नोंदवावा-आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे