अंगणवाडी मदतनीस (मानधनी) भरती उमेदवारांची अंतिम व प्रतिक्षा यादी प्रसिद्ध

नांदेड (जिमाका) – महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन निर्णय 2 फेब्रुवारी 2023 नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा नांदेड या कार्यालयातील अंगणवाडी मदतनिसांचे रिक्त पदे सरळ नियुक्तीने भरण्यासाठी पात्र नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका अंतर्गत स्थानिक रहिवाशी असलेल्या महिला उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज 10 जुलै 2023 पर्यंत मागविण्यात आले होते. त्याअनुषंगाने उमेदवारांची अंतिम व प्रतिक्षा यादी http//nanded.gov.in या संकेतस्थळावर व तसेच संबंधित नगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत यांच्या नोटीस बोर्डावर 18 सप्टेंबर 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे आवाहन व्हि. एस. बोराटे बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा नांदेड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *