नांदेड(प्रतिनिधी)-समाजाला विघातक ठरेल असा एक युवक एमपीडीए प्रस्ताव मंजुर झाल्यानंतर पोलीसांची त्याची रवानगी औरंगाबाद तुरूंगात केली आहे. एमपीडीए प्रमाणे तुरूंगात पाठविला जाणारा चौथा व्यक्ती आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा सुरज भगवान खिराडे (27) याच्याविरुध्द दखलपात्र स्वरुपाचे पाच गुन्हे दाखल आहेत. समाजाला विघातक ठरेल असा हा युवक सध्याच्या परिस्थितीत सुरू असलेल्या सणांच्या दरम्यान समाजात वावरतांना काही समस्या निर्माण करील म्हणून त्याच्याविरुध्द पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी एमपीडीए प्रस्तावाअंतर्गत त्याला एक वर्षासाठी स्थानबध्द करण्यात यावे अशी विनंती जिल्हाधिकारी नांदेड यांच्या कडे केली होती. हा प्रस्ताव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मंजुर केल्यानंतर नांदेड ग्रामीण पोलीसांनी त्वरीत प्रभावाने सुरज भगवान खिराडेचा शोध घेतला आणि त्याला एक वर्षाच्या स्थानबध्दतेसाठी औरंगाबाद येथील हरसुल कारागृहात पाठवून दिले आहे. स्थानबध्दतेच्या कायद्यानुसार तुरूंगात जाणारा हा चौथा व्यक्ती आहे.