
नांदेड,(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नांदेड आगारात आणि मध्यवर्ती बसस्थानकात विश्वासू प्रवासी संघटनेतर्फे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन १७ सप्टेंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. संघटनेने ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, त्यांचे कुटुंबीय आणि लष्करातील निवृत्त अधिकारी, जवानांचा हृदयसत्कार केला.
१७ रोजी सकाळी ८ वाजता एसटी आगारात आगार व्यवस्थापक आशिष मेश्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन मानवंदना देण्यात आली. तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची शपथ देण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक अशोक चव्हाण, संदीप गादेवाड, बसस्थानक प्रमुख यासीन हमीद खान, वाहतुक निरीक्षक सुधाकरराव घुमे, ओमप्रकाश इंगोले, मोबीन मैनोद्दीन शेख, लेखाकार सतीश गुंजकर, चार्जमन श्रीनिवास रेणके, विष्णू हारकळ, एसटी मेकॅनिक गुणवंत एच. मिसलवाड, पाळीप्रमुख संभाजी जोगदंड, वाहतुक नियंत्रक सौ. जयप्रीतकौर मदनुरकर, कल्पना कदम, सुनील मोरे, राजेश्वर नलबलवार, सुरेश फुलारी, पवन पटोळे उपस्थित होते. प्रास्ताविक व सुत्रसंचालन गुणवंत मिसलवाड यांनी केले.
स्वातंत्र्यसैनिक,माजी सैनिकांचा सन्मान
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्त नांदेडच्या मध्यवर्ती बसस्थानकात विश्वासू प्रवासी संघटनेने ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, त्यांचे कुटुंबीय व लष्करातून निवृत्त झालेले अधिकारी, जवानांचा ह्द्य सत्कार केला. बापू भानुदास जोशी, इंदिराबाई गोविंदराव टाकळीकर यांचे प्रतिनिधी ….., गयाबाई व्यंकटराव करडिले नागापूर, रत्नाबाई जयराम धनगे, त्यांचे पुत्र आर.जे.धनगे, स्वातंत्र्यसैनिकांचे वारस प्रा.सौ.ललिता कुंभार, राजकमलसिंघ गाडीवाले, लष्करातून निवृत्त व परंतु आता अन्य सेवेत असलेले दत्तात्रय पोतगंटे, कॅप्टन सुभाष काकडे, सुभेदार मेजर लक्ष्मण विश्वास, बालाजी बळीराम घुगे, रमेश अर्जुन रणवीर, जी.डी.वटाणे, सचिन घुगे, अरुण कल्याणकर यांचाही यावेळी शिरोपाव, हार, पुष्पगुच्छ देऊन विश्वासू प्रवासी संघटनेतर्फे हृद्यसत्कार करण्यात आला. यावेळी रत्नाबाई धनगे यांनी राष्ट्रीय पाळणा सादर करुन प्रेरणा दिली. तसेच प्रसिध्द गायिका रेखा मनाठकर यांनीही आपण आपल्या आयुष्यात २६ जानेवारी, १५ ऑगस्ट आणि १७ सप्टेंबर हे तीन राष्ट्रीय कार्यक्रम दिन सातत्याने साजरा करीत आहोत. या दिनाच्या माध्यमातून देशवासीयांसाठी बलिदान देणाऱ्यांचे स्मरण होते आणि त्यांच्या प्रती आदर व्यक्त केला जातो असे सांगितले. तसेच त्यांनी ख्यातनाम साहित्यिक प्रा.लक्ष्मीकांत तांबोळी यांचे मराठवाडा गीत हे सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळविली. यावेळी विश्वासू प्रवासी संघटनेचे कोषाध्यक्ष बालाजी पवार यांना अनंतराव नागापूरकर उत्कृष्ट संघटक पुरस्कार मिळाल्याने त्यांचाही संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास बसस्थानक प्रमुख यासीन खान, संघटनेचे अध्यक्ष शंकर नांदेडकर, उपाध्यक्ष कृष्णा उमरीकर,सचिव प्रा.सौ.ललिता कुंभार, नियोजन समिती प्रमुख राजकमलसिंघ गाडीवाले, कार्यालयीन प्रमुख हरजिंदरसिंघ संधू,सदस्य गणेश वडगावकर,सदस्य गणपत पाचंगे, सदस्य दत्तात्रय आदमाने उपस्थित होते.