नांदेड(प्रतिनिधी)-संजय बियाणी यांच्या हत्याकांडातील प्रत्यक्ष गोळी झाडणाऱ्या दोन युवकांपैकी एक ज्याची पोलीस कोठडी आज प्रभारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.आर.पटवारी यांनी पाच दिवसांसाठी वाढवून दिली आहे.
एनआयएने सर्वात अगोदर संजय बियाणी यांची हत्या करतांना आणि गोळ्या झाडणारे दोन युवक पकडले होते. त्यानंतर नांदेड पोलीसांनी या प्रकरणात हस्तांतरण वॉरंटवर प्रत्यक्ष गोळी झाडणाऱ्या दोन युवकांपैकी एक दिपक उर्फ दिपुना उर्फ सुनिल सुरेशकुमार रांगा (23) रा.सुरखपुर ता.जि.झज्जर राज्य हरीयाणा यास 11 सप्टेंबर रोजी न्यायालयासमोर हजर केले होते. विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक 119/2022 मध्ये 11 सप्टेंबर रोजी न्यायालयाने रांगाला 10 दिवस अर्थात आज 21 सप्टेंबर 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले होते.
आज पोलीस कोठडी संपल्यानंतर देगलूरचे पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख, पोलीस उपनिरिक्षक नरहरी फड, दशरथ आडे, पोलीस अंमलदार राजकुमार डोंगरे, साहेबराव सगरोळीकर आणि पोलीस मुख्यालयातील तीन सशस्त्र जवानांनी दिपक रांगाला न्यायालयात हजर केले. जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.रणजित देशमुख यांनी या प्रकरणातील बरेच सत्य अजून शोधायचे आहेत. म्हणून पोलीस कोठडी वाढवून द्यावी अशी विनंती न्यायालयास केली. न्यायालयाने पोलीसांची विनंती मान्य करत दिपक रांगाला पाच दिवस अर्थात 25 सप्टेंबर 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
आज सकाळी संजय बियाणीवर त्यांच्या घरासमोर झालेल्या गोळीबाराचे घटनेचे पुर्नउभारण केले. ज्यामुळे या हल्लेखोरांनी कसे बियाणीच्या गाडीचा पाठलाग केला आणि बियाणी गाडी खाली उतरल्यानंतर त्यांच्यावर अनेक गोळ्या झाडल्या. या प्रकरणातील दिव्यांश नावाचा दुसरा मारेकरी अद्याप एनआयए न्यायालयानेे नांदेड पोलीसांना दिलेला नाही. या प्रकरणात पोलीसांनी आता सर्वच आरोपी जवळपास अटक केले आहेत. रिंदा आणि दिव्यांश या गुन्ह्यात पकडणे शिल्लक आहेत.
संबंधीत बातमी..
https://vastavnewslive.com/2023/09/11/संजय-बियाणी-हत्याकांडात-6/