नांदेड(प्रतिनिधी)– नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेडच्या स्वच्छता विभागामार्फत स्वच्छता ही सेवा -इंडियन स्वच्छता लीग 2.0 अंतर्गत आज दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी सलग दुसऱ्या दिवशी सकाळी 7.00 ते सकाळी 9.00 या कालावधीत गोदावरी नदी घाटावरील गोवर्धन घाट ,बंदा घाट, शनि घाट परिसरात डॉ. महेशकुमार डोईफोडे व मा. व्यंकटेश काब्दे यांच्या प्रमुख उपस्थितीत नदी घाटावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
आज नदी घाटावर स्वच्छता विभागामार्फत जेसीबी, अग्निशमन विभागाचे वाहन, गल्फर, ट्रॅक्टर,2- 407वाहान, एक घंटागाडी ,पंप 2 व मनुष्यबळाद्वारे नदीपात्रा जवळील गाळ, निर्माल्य पालापाचोळा, जुनी कपडे ,प्लास्टिक मोठ्या प्रमाणात जमा करण्यात आला. अंदाजे आठ टन कचरा यावेळी काढण्यात आला. तसेच नदी घाट परिसरात मशीन द्वारे पाणी फवारणी करून माती काढण्यात आली.
या स्वच्छता रॅलीत उपायुक्त (स्वच्छता) निलेश सुंकेवार, नागरिक कृती समिती नांदेडचे कॉम्रेड के.के. जांबकर, एड. धोंडीबा पवार, प्रा. डॉ. लक्ष्मण शिंदे, डॉ. पुष्पा कोकाटे ,आर डी खटके,शंकर कापकर ,वृक्षमित्र फाऊंडेशनचे संतोष मुगटकर व सदस्य, महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी राजेश पातळे ,सहाय्यक आयुक्त (स्वच्छता) गुलाम मो सादिख, क्षेत्रीय अधिकारी डॉ. मिर्झा फरतुल्लाह बेग, रमेश चवरे, संभाजी कास्टेवाड, सहाय्यक आयुक्त सदाशिव पतंगे ,अंतर्गत लेखापरीक्षक सुधीर इंगोले, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, उप अभियंता प्रकाश कांबळे, वसीम तडवी, स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्र यांचे सदस्य ,प्रतिष्ठित नागरिक ,पर्यावरण प्रेमी ,महिला यांच्यासह महानगरपालिकेच्या स्वच्छता व विविध विभागातील अधिकारी कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी स्वामी समर्थ मंदिरा तर्फे उपस्थितांना चहा पाण्याची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली .
मा. आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे यांनी शहरातील प्रत्येक नागरिकांनी स्वच्छतेबाबत आपल्यापासून ,आपल्या घरापासून सुरुवात करावी, प्रत्येक नागरिकांनी स्वच्छतेबाबत जागरूक राहावे, नदीपात्रात निर्माल्य टाकू नये, निर्माल्य नदी ठिकाणी असलेल्या कचराकुंडी मध्ये टाकावा ,नागरिकांनी सुद्धा नदीकाठ परिसर स्वच्छ राहील याबाबत काळजी घ्यावी असे आवाहन केले.
मा. खासदार मा.व्यंकटेश काब्दे यांनी महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या विशेष स्वच्छते मोहिमेचे कौतुक केले व महापालिका प्रशासनाचे आभार मानले.
शेवटी आयुक्त यांनी स्वच्छतेच्या शपथे चे वाचन केले व उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ घेतली, यावेळी आपना शहर स्वच्छ करेंगे नही रूकेंगे, नही रूकेंगे, आपले शहर सुंदर शहर ,नांदेड शहर हरित शहर अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
गोदावरी नदी परिसरात आज स्वच्छता मोहीम राबविल्या मुळे नदी घाट परिसर स्वच्छ व सुंदर दिसत असल्याने नागरिकांनी व पर्यावरणप्रेमी यांनी समाधान व्यक्त केले.
आजच्या विशेष सहभागी होऊन उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल उपायुक्त सुंकेवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
तसेच महापालिकेच्या स्वच्छता विभागामार्फत स्वच्छता ही सेवा -विशेष स्वच्छता मोहीम अंतर्गत दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7.00 ते सकाळी 09.00 या कालावधीत श्रावस्ती नगर परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
महानगरपालिकेच्या वतीने आयोजित स्वच्छता अभियान शहरातील सर्व वयोगटातील स्वच्छता प्रेमी नागरी,शासकीय ,निम शासकीय ,खाजगी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी, एन एस एस एनसीसी ,शाळा कॉलेजच्या विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, स्वयंसेवी संस्था यांनी महानगरपालिकेच्या वतीने आयोजित उपरोक्त अभियानास स्वयंस्फुर्तीने सहभाग नोंदवावा व जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन अभियान यशस्वी करण्यास व नांदेड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या संकल्पना पूर्ण करण्यास सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त निलेश सुंकेवार यांनी केले आहे.