परभणी (प्रतिनिधी)-मे मध्ये घरून निघाला कामासाठी. त्याचा खून झाला 21 सप्टेंबरच्या अगोदर रात्री काहीच माहिती उपलब्ध नसतांना अनोळखी माणसाच्या मृत्यूचे कारणीभूत तीन मारेकरी परभणी पोलीसांनी 12 तासात त्यांना पकडल्यानंतर न्यायालयाने त्या मारेकऱ्यांना पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.21 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेच्यासुमारास जिंतूर बसस्थाकाजवळ नाला आहे. त्यात दाट प्रकारची झाडे झुडपे आहेत. त्या दाट झाडाझुडपांमध्ये 35 ते 40 वर्षाच्या अनोळखी व्यक्तीचे प्रेत बसस्थानकजवळच्या त्या दाट झाडाझुडूपामध्ये असल्याची माहिती जिंतूर पोलीसांना मिळाली. मरणाऱ्या व्यक्तीचा चेहरा व डोके पुर्णपणे रक्ताने माखलेले होते. त्याच्या गळ्यात रुमालाने गाठमारून आवळलेले दिसत होते. त्याप्रमाणे जिंतूर पोलीसांनी अनोळखी मयत माणसाला मारणाऱ्या अनोळखी मारेकऱ्यांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 302 प्रमाणे गुन्हा क्रमांक 392/2023 दाखल केला. घटनेचे गांभीर्य पाहुन परभणीच्या पोलीस अधिक्षक रागसुधा आर. यांनी या अनोळखी व्यक्तीची ओळख पटवून आरोपी त्वरीत निष्पन्न करण्याची सुचना स्थानिक गुन्हे शाखा परभणी आणि जिंतूर पोलीसांना दिली. या अनोळखी मयताची ओळख पटवणे सर्वात महत्वपुर्ण होते. जिंतूर पोलीसांनी वेगवेगळ्या माहितीच्या आधारावर या अनोळखी मयताची ओळख पटवली. अनोळखी मयत हा महेंद्र यशवंत सावंत रा.वाघजाईवाडी पोस्ट डेरवण ता.पाटण जि.सातारा असा होता. त्याच्या भाऊ मच्छिंद्र यशवंत सावंत रा.मुंबई यास मयताचा फोटो पाठवून त्याची खात्री करण्यात आली. मयत झालेल्या महेंद्र सावंतने मे महिन्यात विटा जि.सातारा येथे कामासाठी जातो म्हणून घरातून गेला होता. तेंव्हापासून त्याचा संपर्क नाही अशी माहिती महेंद्र सावंत यांच्या कुटूंबियांनी दिली.
त्यानंतर तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून मिळालेल्या माहितीनुसार खून झालेला महेंद्र यशवंत सावंत हा 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 ते 6.30 वाजेदरम्यान पायी चालत बस स्थानकामधील झुडूपांकडे गेला होता. त्याच्या पाठीमागेच तीन सशंयीत व्यक्ती गेले. पोलीसांनी अत्यंत त्वरीत प्रभावाने तांत्रिक आधार आणि गोपनिय माहितीदार यांच्या मदतीने मयत झालेला महेंद्र यशवंत सावंत याच्या पाठीमागे गेलेले शेख मुसेफ शेख मोसीन (21) , भारत आसाराम पहारे (28) दोघे रा.नामदेवनगर जिंतूर आणि राजेश पांडूरंग शिंदे (30) रा.संभाजीनगर जिंतूर या तिघांना ताब्यात घेतले. त्यांनी एकटा महेंद्र यशवंत सावंत झडूपांमध्ये गेला ही संधी साधून त्याच्याकडील पैसे लुटण्यासाठी या तिघांनी हा खून प्रकार केल्याचे कबुल केले.
अवघ्या 12 तासात अनोळखी मयताची ओळख पटवणे त्याचे अनोळखी मारेकरी शोधून त्यांना पकडणाऱ्या पथकाचे पोलीस अधिक्षक रागसुधा आर., अपर पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी जिंतूर गाफणे, स्थानिक गुन्हा शाखेचे वसंत चव्हाण, जिंतूरचे पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे, पोलीस उप निरिक्षक गोपिनाथ वाघमारे, पोलीस अंमलदार विलास सातपुते, सिध्देश्र्वर साठे, विष्णु चव्हाण, राम पौळ, नामदेव डुबे, मधुकर ढवळे, संजय घुगे, मुरकुटे, सायबर पोलीस ठाण्याचे बालाजी रेड्डी आणि गणेश कौटकर यांचे कौतुक केले आहे.