माजी मंत्री खतगावकर, रावणगावकर, नागेलीकर यांची नावे आघाडीवर
नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा मध्यवतीर्र् बॅंकेच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागेल याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. या पदासाठी माजी मंत्री खतगावकर, माजी सभापती रावणगावकर, कॉंगे्रस जिल्हाध्यक्ष नागेलीकर यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे. मात्र अशोकराव चव्हाण यांचा कोणाच्या डोक्यावर हात असेल हे मात्र सध्या तरी समजू शकले नाही.
नांदेड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेवर कॉंगे्रस पक्षाची एक हाती सत्ता आहे. यात विरोधक म्हणून खासदार पिता-पुत्र खा.प्रताप पाटील चिखलीकर आणि प्रविण पाटील चिखलीकर हे दोनच संचालक विरोधी बाकावर आहेत. कॉंगे्रस आणि राष्ट्रवादी कॉंगे्रसची आघाडी झाली होती. मात्र या आघाडीत बहुमतांनी उमेदवार निवडूण आले. तर पहिल्या टप्यात माजी आमदार वसंतराव चव्हाण यांना अध्यक्षपदाची संधी दिली होती. तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंगे्रसचे जिल्हाध्यक्ष हरीहर भोसीकर यांची उपाध्यक्षपदी निवड केली होती. मात्र अचानक वसंतराव चव्हाण यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा का दिली? हे मात्र अद्यापही समजू शकले नसले तरी एटीएम घोटाळा अंगलट येवू नये म्हणून राजीनामा दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चिली जात आहे. अध्यक्षपदाचा राजीनामा मंजुर झाल्यानंतर पुढील अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी बॅंके प्रशासनाने लातूर येथील उपविभागीय कार्यालयाकडे पाठविला. अध्यक्ष पदासाठी माजी मंत्री व माजी अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांचे नाव चर्चेत असले तरी ते सध्या अध्यक्षपद स्विकारण्यास सध्या तरी इच्छूक नाहीत.तर दुसरीकडे मागील पाच वर्ष आणि विद्यमान संचालक मंडळात असणारे जि.प.चे माजी सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर यांचेही नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे. कारण सहकार क्षेत्रातील अनुभव यांच्या पाठीमागे भक्कमपणे आहे. लातूर येथील एका बॅंकेत 10 वर्ष मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर त्यांनी काम केल आहे. याचबरोबर भोकर मतदार संघातील अशोकराव चव्हाण यांचे खंदे समर्थक म्हणूनही त्यांच्याकडे पाहिल जात. सध्या तरी अध्यक्ष पदाचे प्रमुख दावेदार म्हणून रावणगावकर यांच नाव आघाडीवर आहे. तरी दुसरीकडे कॉंगे्रसचे जिल्हाध्यक्ष आणि अशोकराव चव्हाण यांचे विश्र्वासू गोविंदराव नागेलीकर हेही या अध्यक्षपदासाठी दावेदार आहेत. मात्र त्यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पद असल्यामुळे त्यांची अध्यक्षपदी वर्णी लागेल की नाही हे मात्र सध्या तरी सांगता येत नाही.
जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदासाठी अजून वेळ असला तरी अशोकराव चव्हाण यांनी अध्यक्षपदाच्या उमेदवाराची चाचपणी सध्या तरी केली आहे. ते रविवारी नांदेड शहरात दाखल झाले आणि बॅंकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारासंदर्भात प्राथमिक चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे या पदावर नेमकी कोणाची वर्णी लागेल हे मात्र सध्या तरी समजू शकले नाही.