नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंद पडलेली सुतगिरणी आणि एक लाकडे कापण्याचा कारखाना याच्या आसपास बिल्डर नावाच्या व्यक्तीने मोठा जुगार अड्डा सुरू केला आहे. आता माझे कोणीच काही वाकडे करू शकत नाही असे सांगतांना 25 मोदके मागून खाणाऱ्या पत्रकारांना दिली आहेत असे जोरात सांगत आहे.
जुगार अड्डा चालवणे एका दृष्टीकोणातून उद्योग आहे. कारण 52 पत्यांच्या जुगारात आपले नशिब आजमावण्यासाठी भरपूर जण प्रयत्न करत असतात. मग असे नशिब आजमवणाऱ्यां लोकांसाठी काही लोक सेवेसाठी लागतात. पोलीसांची गाडी येत आहे काय हे पाहण्यासाठी काही लोक लागतात. जुगाऱ्यांच्या खाण्या-पिण्याची सोय करण्यासाठी सुध्दा काही लोक लागतात. मग एवढ्या लोकांना त्या जुगार अड्ड्यातून रोजगार मिळणार असेल. तर तो उद्योगच झाला ना?. तरी पण हा उद्योग बेकायदेशीरच आहे. त्यांच्यावर कायद्याचे कोरडे ओढणाऱ्यांना 100, 200 मोदके दिली जातात. कधी-कधी बोनस स्वरुपात सुध्दा मोदके घेतली जातात. कधी-कधी पत्रकारांना देण्यासाठी पण मोदके घेतली जातात आणि अशी अनेक मोदके देणारा व्यक्ती कायद्याच्या कोरड्यांना कसा भिईल आणि कायद्यांच्या कोरड्यांची भिती जगात कशी राहिल.
52 पत्यांचे जुगार अड्डे चालवणारे किंबहुना 52 पत्यांच्या जुगारांचा उद्योग चालवणारे अनेक उद्योगपती आहेत. प्रत्येकाचे आप-आपले प्रभाव वापरत असतात आणि जुगाराचे अड्डे बिनदिक्कत चालू असतात. अशाच प्रकारचा एक जुगार अड्डा नांदेड-हैद्राबाद रस्त्यावर गोदावरी नदीतील जुन्या पुलाच्या पलिकडे बंद असलेली सुतगिरणी आणि तेथे जवळच असलेल्या लाकुड कापण्याच्या कारखान्याच्या आसपासमध्ये, एका गोडाऊनमध्ये पंचतारांकीत 52 पत्यांचा जुगार अड्डा चालवणाऱ्या उद्योजकाचे नाव बिल्डर आहे म्हणे. बिल्डर या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत. पण हा बिल्डर म्हणजे पहिलवानापेक्षा काही कमी नाही. आता त्याला कुस्ती लढता येते की, फक्त जुगाराचाच अड्डा चालवता येतो याची काही एक खात्री झालेली नाही. मागे एकदा त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेत प्रतिबंधक कार्यवाही सुध्दा करण्यात आली होती. त्या कार्यवाहीसाठी बिल्डर एलसीबीत आला तेंव्हा ज्याप्रमाणे इतर लाडक्या आरोपींना स्थानिक गुन्हा शाखेतील सुंदर अशा टाईल्सवर बसवले जाते. परंतू बिल्डरला तसे करण्यात आले नव्हते. त्यांच्यासाठी खुर्ची राखीव ठेवण्यात आली होती. जुगाराचा हा लोकांना उत्पन्नाचे स्त्रोत देणारा हा उद्योग भरभराटीला जावो आणि मोदकांची संख्या वाटण्यामध्ये वाढ होवो हीच शुभकामना.
नदी पलिकडे चालतो बिल्डरचा मोठा 52 पत्यांचा जुगार अड्डा