श्री गणेश विसर्जनाच्या दिवशी भरणारे आठवडी बाजार राहणार बंद

नांदेड (प्रतिनिधी)- श्री गणेश विसर्जन मार्गात भरणाऱ्या आठवडी बाजारामुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊ नये, तसेच मिरवणूक मार्गात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये व गणेश विसर्जन शांततेत पार पाडावे यादृष्टीकोणातून नांदेड शहर व जिल्ह्यात (अनंत चतुर्थीच्या) दिवशी गुरुवार 28  सप्टेंबर 2023 रोजी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केले आहेत.
मार्केट अँड फेअर क्ट 1862 चे कलम 5 (अ) अन्वये जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी हे आदेश निर्गमीत केले आहेत. हे आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार 29 सप्टेंबर 2023  रोजी भरविण्यात यावेत, असे आदेशात स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *