सरकारच्‍या सुवर्ण काळात युवकांना नौकरीची संधी– केंद्रीय राज्‍यमंत्री रावसाहेब दानवे  

नांदेड येथे 9 व्‍या रोजगार मेळाव्‍याचे आयोजन

केंद्रीय रेल्‍वे राज्‍यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्‍याहस्‍ते 119 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान

नांदेड(प्रतिनिधी)-येथील न‍ियोजन भवनात आयोज‍ित करण्‍यात आलेल्‍या नवव्‍या रोजगार मेळाव्‍याला केंद्रीय रेल्‍वे कोळसा आण‍ि खन‍िज राज्‍य मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची प्रमुख उपस्‍थीती होती. यावेळी खासदार प्रतापराव पाटील च‍िखलीकर, आमदार रामराव पाटील रातोळीकर, दक्ष‍िण मध्‍य रेल्‍वेच्‍या व‍िभागीय व्‍यवस्‍थापक न‍िती सरकार, विभागीय डाक व्‍यवस्‍थापक अदनान अहमद, ज‍िल्हाध‍िकारी अभ‍िज‍ित राऊत, जिल्‍हा पोल‍िस अध‍िक्षक श्रीकृष्‍ण कोकाटे, ज‍िल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी म‍िनल करनवाल आदींची प्रमुख उपस्थीती होती.

नवव्‍या रोजगार मेळाव्‍याच्‍या माध्‍यमातून नांदेड येथील डाक व‍िभाग, भारतीय अन्‍न महामंडळ, महाराष्‍ट्र ग्रामीण बँक, आयकर व‍िभाग, केंद्रीय लोकन‍िर्माण व‍िभागाच्‍या शंभराहुन अध‍िक बेरोजगार युवकांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते न‍ियुक्‍तीपत्र देण्‍यात आले. यात भारतीय डाक व‍िभागाच्‍या 94 तर इतरव व‍िभागाच्‍या 25 न‍ियुक्‍तीपत्रांचा समावेश आहे. या मेळाव्‍यामध्‍ये महाराष्‍ट्रातील नांदेड, परभणी, संभाजीनगर, धार‍ाश‍िव( लातूर, भुसावळ, जळगाव या ज‍िल्‍हयातील युवकांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते न‍ियुक्‍तपत्र देण्‍यात आले.

यावेळी केंद्रीय राज्‍यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी प्रधानमंत्री मोदींनी 2047 च्‍या भारताचे स्‍वप्‍न डोळयासमोर ठेवून न‍ि‍र्णय घेण्‍यास सुरूवात केली आहे. पुढील 25 वर्षाचे न‍ियोजन पंतप्रधान करत असून या काळात आपल्‍याला देशाची सेवा करण्‍याची संधी म‍िळत आहे त्‍यामुळे केंद्र सरकारचा आणि‍ देशाच्‍या सुवर्ण काळात युवकांना नौकरीची उपलब्‍ध होत असल्‍याचे प्रत‍िपादन यावेळी बोलतांना राज्‍यमंत्री दानवे यांनी केले. या मेळावाच्‍या माध्‍यमातून समाजात‍ील सर्व वर्गाला समाव‍िष्‍ठ करण्‍यात आले असल्‍याचेही दानवे यांनी सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *