उद्याचा प्रवास पर्यायी मार्गांचा विचार करून सुनिश्चित करा-पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे

नांदेड(प्रतिनिधी)-उद्या दि.28 सप्टेंबर रोजी श्री गणेश विसर्जन होणार आहे. या दरम्यान 28 सप्टेंबरच्या सकाळी 11 ते रात्री 12 वाजेदरम्यान बरेच रस्ते वाहतुकीसाठी बंद असतील. त्याला पर्याय म्हणून पोलीस विभागाने पर्यायी रस्ते सुचवलेले आहेत. उद्याच्या आपल्या प्रवासाचा मार्ग ठरवतांना बंद असलेल्या रस्त्यांचा विचार करून आपला प्रवास मार्ग ठरवावा असे आवाहन पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले आहे.
दि. 28 सप्टेंबर हा श्री गणेश उत्सवातील शेवटचा दिवस. या दिवशी सर्वत्र श्री गणेशांचे विसर्जन होणार आहे. त्यासाठी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार त्यांना प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करून काही रस्ते श्री विसर्जन होईपर्यंत बंद केले आहेत आणि त्या रस्त्यांना पर्यायी मार्ग सुध्दा सुचवले आहेत.
वाहतुकीकरीता बंद असलेले मार्ग…
जुना मोंढा-देना बॅंक-महाविर चौक-तरोडेकर मार्केट-वजिराबाद चौक-कललामंदिर-शिवाजीनगर ते आयटीआय चौक जाण्या-येण्याचे दोन्ही मार्ग बंद असतील. राजकॉर्नरकडून आयटीआयकडे येण्यासाठी राज कॉर्नर-वर्कशॉप टी पॉईंट-श्रीनगर ते आयटीआयपर्यंत डावी बाजू बंद राहिल. राजकॉर्नर ते तरोडानाकाकडे जाणारी वाहतुक डाव्या बाजूने बंद राहिल. हडको-सिडको ते जुना मोंढाकडे येणारी वाहतुक पुर्णपणे बंद राहिल.
वाहतुकीकरीता पर्यायी मार्ग…
वजिराबाद चौककडून श्रीनगर-वर्कशॉपकडे जाणारी वाहतुक-पोलीस मुख्यालय-लालवाडी अंडरब्रिज-शिवाजीनगर(पिवळी गिरणी) ते गणेशनगर वायपॉईंटकडे जाण्या-येण्यासाठी वापर करता येईल. राज कॉर्नर ते जुना मोंढा मार्गावरील वाहतुक राजकॉर्नर-वर्कशॉप कॉर्नर-भाग्यनगर-आनंदनगर-नागार्जुना टी पॉईंट-अण्णाभाऊ साठे चौक-यात्रीनिवास पोलीस चौकी-अबचलनगर ते पुढे जाण्या-येण्यासाठी वापर करता येईल. गोवर्धनघाट पुलावरून नांदेड शहरात येणारी वाहतुक तिरंगा चौक-पोलीस मुख्यालय कॉर्नर-लालवाडी अंडरब्रिज-पिवळी गिरणी ते गणेशनगर वॉयपॉईंट जाण्या-येण्यासाठी वापरात आहे. हडको-सिडकोकडून नांदेड शहरात येणारी वाहतुक साई कमान-कौठा पोलीस चौकी-रविनगर-गोवर्धनघाट नवीन पुल-तिरंगा चौक-पोलीस मुख्यालय-लालवाडी अंडरब्रिज-गणेशनगर वॉयपॉईंटकडे जाण्या-येण्यासाठी वापरता येईल.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, उद्या दि.28 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते रात्री 12 वाजेपर्यंत आपला प्रवास करतांना पर्यायी मार्गांवर लक्ष ठेवून आपला-जाण्या-येण्याचा प्रवास सुनिश्चित करावा. जेणे करून नागरीकांना त्रास होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *