नांदेड(प्रतिनिधी)-1 ऑक्टोबर रोजी अंतरवली ता.अंबड येथील मनोज जरांगे पाटील हे नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांनी सरकारला दिलेल्या मुदतीनंतर अर्थात 40 दिवसात मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळाले नाही तर उग्र आंदोलन कसे असते हे नांदेड जिल्ह्यातील मराठा समाज राज्याला दाखवून देईल अशा शब्दात सकल मराठा समाजातील नेत्यांनी आज पत्रकारांना संबोधीत केले.
मनोज जरांगे पाटील यांचा 1 ऑक्टोबरचा दौरा सांगण्यासाठी बोलवलेल्या पत्रकार परिषदेत सकल मराठा समाजातील अनेक नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.मराठा समाजाल फक्त आरक्षण हवे या भुमिकेतून मराठा आंदोलन झाले. परंतू या आंदोलनातून कोणतीही खरी दिशा सापडली नाही आणि त् यावरून शासनाने मराठा समाजाला मुर्ख बनवले. परंतू मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी या प्रवर्गातच मराठा आरक्षण हवे आणि ते सुध्दा 40 दिवसांत असा इशारा सरकारला दिला आहे आणि त्यासाठी संपुर्ण मराठा समाजाला संवेदनशिल करण्यासाठी ते महाराष्ट्राचा दौरा करीत आहेत.

- जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज राज्यभर सुरु असलेल्या धरणे आंदोलनामध्ये सकल मराठा समाजातील महिलांनी सहभाग नोंदवला आहे.
संभाजी महाराज, पुरूषोत्तम खेडेकर, धनंजय पाटील, नानासाहेब जावळे पाटील आणि प्रविण गायकवाड यांना सुध्दा 1 ऑक्टोबर रोजी नांदेड येथे आमंत्रित करण्यात आले आहे. या प्रत्येक व्यक्तीने मराठा समाजासाठी भरपूर काही योगदान दिलेले आहे. दि.1 ऑक्टोबर रोजी उमरखेड मार्गे मनोज जरांगे पाटील हदगाव येथे येतील.हदगाव येथे जाहीर सभा होईल. त्यानंतर ते कामारी येथील आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या सुदर्शन देवराये यांच्या घरी सांत्वनापर भेट देतील. त्यानंतर अर्धापूर येथे जाहीर सभा होईल आणि सायंकाळी नांदेडच्या मार्केट कमिटी मैदानावर दुसरी जाहीर सभा होईल. सकल मराठा समाजाने आमच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावे आणि सभेला उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाजाने केले.
पत्रकार सुरू होण्याअगोदर सकल मराठा समाजाची बैठक शासकीय विश्रामगृहात बैठक सुरू होती. दिलेल्या वेळेप्रमाणे सर्व पत्रकार हजर झाल्यानंतर मात्र तेथे त्या बैठकीच्या कक्षातून वेगवेगळे आवाज येत होते. या आवाजांना कोणत्या शब्दात वर्णन करावे या संदर्भाने आमची अवस्था सुध्दा भ्रमीत आहे. पण सकल मराठा समाजातील काही लोकांना पत्रकार आले आहेत याची जाणीव झाल्यानंतर बैठकीच्या कक्षाचे दरवाजे बंद करण्यात आले.