हिमायतनगर(प्रतिनिधी)-तालुक्यातील मौजे एकंबा येथे आज 29 सप्टेंबर रोजी शेतात नेहमी काम करणारी महिला सातत्याने रोज शेतात जात असताना अचानकपणे आभाळ दाटून आले आणि जोरदार पावसाची सुरुवात झाली त्यामध्ये विजांचा कडकडाट पाहून महिला घाबरली मात्र शेवटी काळाने झेप महिलेवर घेतली असून शेतात काम करणाऱ्या महिलेच्या अंगावर विज पडून एक 48 वर्षे महिलेवर वीज कोसळल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दुपारी घडली आहे.
मृत्यू असलेल्या महिलेचे नाव श्रीमती शांताबाई पुंजाराम खंदारे वय 48 वर्ष शेतात काम करत होत्या आजही त्या शेतात गेल्याने पावसाची सुरुवात झाल्यामुळे त्यांनी येळ्याच्या झाडाखाली व लिंबाच्या झाडाखाली थांबल्यामुळे त्याच झाडावर वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू आज रोजी 29 सप्टेंबर च्या दुपारी अंदाजे तीन दरम्यान झाला आहे. तालुक्यातील मौजे एकंबा परिसरातील शेतात अचानकपणे पाऊस सुरू झाल्याने विजासह वादळी वारे विजांच्या कडकडाटासह पावसात शेतात काम करणाऱ्या महिला श्रीमती शांताबाई पुंजाराम खंदारे या महिलेवर वीज कोसळली आहे
या घटनेची माहिती मिळतात हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी पोलीस स्टेशनला नोंद घेतली आहे तसेच आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांना घटनेचा वृत्तांत मिळतात तात्काळ घटनास्थळी जाऊन त्यांनी पाहणी केली व मयतांच्या कुटुंबाला अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करीन असे आश्वासन देऊन तहसीलदार यांना त्यांनी संपर्क केला आहे या घटनेमुळे एकांबा या गावावर शोककळा पसरल्याने हिमायतनगर तालुक्यात महिलेच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
शेतात काम करणाऱ्या महिलेच्या अंगावर वीज कोसळून महिलेचा मृत्यू