धर्माबाद(प्रतिनिधी)-येथील माजी नगराध्यक्ष विनायकराव वसंतराव कुलकर्णी वय 69 यांचे नांदेड येथील खाजगी रूग्णालयात शनिवारी दुपारी 1:30 च्या सुमारास निधन झाले.
त्यांच्या निधनामुळे शहराचे विकासाभिमुख नेतृत्व हरवले अशी प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहे. धर्माबाद शहराचे नगराध्यक्षपद भुषविण्याचा मान विनायकराव वसंतराव कुलकर्णी यांना मिळाला. शहर आणि सामान्य जनतेचे प्रश्न मांडणारे प्रतिनिधी अशी तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. गेल्या काही दिवसापासून त्यांची प्रकृती बिघडल्याने नांदेड येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान शनिवारी दुपारी विनायक कुलकर्णी यांची प्राणज्योत मालवली. यामुळे तालुक्यावर शोककळा पसरली आहे. रविवार दि.1 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता रत्नाळी येथे त्यांचा अंत्यविधी होणार आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, जावई, सुन व नातवंडे असा मोठा परिवार आहे. नांदेड येथील प्रसिध्द विधीतज्ञ ऍड.यदुपत अर्धापूरकर यांचे ते सासरे होते.
धर्माबादचे माजी नगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी यांचे निधन