बिल्डरचा जुगार अड्डा आता नदी अलीकडे आला म्हणे..

नांदेड(प्रतिनिधी)-बिल्डरचा जुगार अड्डा नदी पलिकडून नदी अलीकडे एकाच दिवसात शिफ्ट झाला. काल रात्री एका ऍटोमध्ये गेलेल्या काही जणांनी तेथे धाड टाकली की लुट केली हे काही कळले नाही. पण हा घटनाक्रम घडला आहे अशी माहिती वास्तव न्युज लाईव्हच्या खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.
वास्तव न्युज लाईव्हने लोकांना उदरजिविकेचे संसाधन देणारा एक मोठा जुगार अड्डा नदीच्या पलिकडे जोरात सुरू असल्याची बातमी 26 सप्टेंबर रोजी प्रसिध्द केली होती. त्यानंतर बरेच चक्र फिरले आणि हा जुगार अड्डा नदीपलिकडून नदीच्या अलीकडे एका कमानीच्या आत गेल्यावर एका घरात सुरू करण्यात आला.या बिल्डरने स.आदत हसन मन्टो यांच्या शब्दाप्रमाणे विहित केलेले पत्रकार आपल्या पक्षात करून घेतले होते अशी चर्चा हा बिल्डर करु लागला होता.पण वास्तव न्युज लाईव्हच्या बातमीनंतर दुर्देवाने त्याच्यावर 52 पत्याच्या जुगार अड्‌ड्याची जागा बदलावी लागली.
आता हा जुगार अड्डा नदी पलिकडून नदी अलीकडे आला. काल दि.29 सप्टेंबरच्या रात्री एक ऍटोमध्ये काही जण त्या जुगार अड्डा चालणाऱ्या घरात शिरले. कोणी आपल्या घरात शिरेल तर घरमालक त्याची काय अवस्था करील हे लिहिण्याची गरज नाही. परंतू घर मालकाने काहीच केलेले नाही. नसता त्याची नोंद इतवारा पोलीस ठाण्यात झाली असती. कारण काही दिवसांपुर्वीच या बिल्डरने एक रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते आणि त्यात पोलीस विभागाने त्याची भरपूर प्रशंसा केली होती.जुगार अड्डा चालवता चालवता अशी सामाजिक कामे सुध्दा होत असतात, किंबहुना दाखविण्यासाठी करावी लागतात असो.
मग काल रात्री या जुगार अड्‌ड्यात शिरलेले व्यक्ती कोण होते? साध्या वेशातील पोलीस? कारण घरात कोणी दुसरे घुसले असते तर घर मालकाने कारवाई केलीच असती. कारण त्याचेही पोलीस विभागाकडे वजन आहे. म्हणून तसे झाले नाही हे निश्चित. मग दुसरा पर्याय ते साध्या वेशातील पोलीस असतील तर कोणत्याही गुन्ह्याची नोंद आता वृत्तलिहिपर्यंत झाले आहे अशी माहिती प्राप्त होत नव्हती. पोलीस असतील तर निलपंचनामा केला असेल काय? केला असेल तर त्याची नोंद कोठे करण्यात आली याची माहिती प्राप्त करण्यात यश आले नाही. असा सर्व काही चालत असते पोलीसांनी निल पंचनामा करून आपली जबाबदारी पुर्ण केल्याचे दाखवून दिले असेल. तो निल पंचनामा गुप्त ठेवला असेल असेही करता येते आणि कधी-कधी असे करावे पण लागते. त्याची कारणे अनेक असतात. त्या कारणांना शोधण्या इतपत आमची मेहनत कमी पडली.पण काही लोकांना उदरनिर्वाह देणारा हा जुगार अड्डा चालला पाहिजे असे वाटते.

स्थानिक गुन्हा शाखा पोलीस निरिक्षकाच्या कक्षात काल भरली होती कार्यशाळा
काल स्थानिक गुन्हा शाखेच्या कार्यालयात पोलीस निरिक्षकांच्या कक्षात एक कार्यशाळा भरविण्यात आली होती.यावेळी पोलीस निरिक्षकांच्या कक्षाचा पडदा बंद होता. या कार्यशाळेचा विषय भारतीय दंड संहितेतील कलम 328 साठी होता अशी गुप्त माहिती प्राप्त झाली आहे. पोलीस निरिक्षक त्या कक्षात नव्हते परंतू कक्षात जाण्यासाठी जागा नव्हती म्हणजे कार्यशाळेची व्याप्ती किती मोठी असेल याचा अंदाज येतो. या कार्यशाळेत प्रमुख कोण होता हे काही पाहता आले नाही. पण भरलेली कार्यशाळा भारीचीच होती असे म्हणायला जागा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *