नांदेड(प्रतिनिधी)-कंधार तालुक्यातील शिराढोण येथे युवक गणेश मंडळ हे मागील 28 वर्षापासून दरवर्षी नाविन्यपुर्ण अशी विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम घेवून आगळावेगळा गणेशोत्सव साजरा करत असतात. यातच दि.2 ऑक्टोबर 2023 रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
मागील 28 वर्षापासून शिराढोण येथील पेठगल्ली येथील युवक गणेश मंडळाची स्थापना केली जाते. या गणेश मंडळाच्यावतीने दरवर्षी धार्मिक, सामाजिक व समाजप्रबोधन अशा विविध सामाजिक उपक्रम साजरा करून गणेशोत्सव साजरा केला जातो. शिराढोण परिसरात नवसाला पावणारा गणपती म्हणूनही याकडे बघितल जात. सतत 11 दिवस रात्रीच्या आरतीच्यानंतर महाप्रसादाचे आयोजन होत असते. याचबरोबर गणेश विसर्जनानंतर महाप्रसाद केला जातो. यामध्ये जवळपास 10 ते 15 हजार भाविक भक्त या महाप्रसादाचा लाभ घेतात. तसेच सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ गणेश भक्तांनी घ्यावा असे आवाहन युवक गणेश मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
शिराढोण येथील युवक गणेश मंडळातर्फे महाप्रसादाचे आयोजन