ईद-ए-मिलादुन्न नबी मिरवणूक उत्साहात संपन्न

नांदेड(प्रतिनिधी)-‘जश्न ईद ए मिलादुन्नबी’ निमित्त शहरात मरकजी मिलाद कमिटी नांदेड तर्फे रविवार रोजी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले या मिरवणुकीत सुन्नी पंथीय मुस्लिम बांधव हजारो च्या संख्येने सामील झाले होते हातात हजरत मुहम्मद पैगंबर यांचा झंडा घेवून हजरत मुहम्मद पैगंबर यांच्यावर दुरूद शरीफ, नात शरीफ, सलातो सलाम पढत, धार्मिक नारे लावत लहान मोठे मुले, तरुण, वृद्ध सामील होते.

जुलूस निजामी कॉलनी येथून 9.45 वाजता निघून मुहम्मद अली रोड अहाता मस्तांनशाह वली दर्गाह मीलाद गग्राउंड जुलूस समापन होऊन तेथे सुन्नी पंथीय धर्मगुरू मुफ्ती तुराबुद्दिन रझवी,मुफ्ती मुर्तूजा मिसबाही,मौलाना अब्दुल अझीम रझवी, मौलाना जुनेद,चे प्रवचन झाले व इतर धर्म गुरूही हजर होते प्रवरचना नंतर  दुपारची जोहर ची नमाज मौलाना सादेक रजवी यांनी पढविली त्यानंतर मुफ्ती मौलाना तुराबुद्दिन रजवी यांनी जगात व देशात सुख समृद्धी राहावी, एक दुसऱ्याच्या रधयात यात एक दुसऱ्याच्या बाबत प्रेम व एकोपा रहावा, शहरात सुख शांती राहावी, हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या दाखवलेल्या वाटेवर सर्वांनी चालावे अशी दुवा करण्यात आली.

कमिटी चे अध्यक्ष म.रफिक व सचिव ॲड.अय्युबोद्दीन जागीरदार यांनी महा नगर पालिका यांनी शहरात मिरवणुकी निमित्त केलेल्या स्वच्छ ता बाबत आणि पोलिस प्रशासनाचे, जिल्हा प्रशासनाचे केलेल्या चोख बंदोबस्ता बाबत व सहकार्या बाबत आणि शहरातील जागी जागी केलेल्या पाणी,शरबत, मिठाई वाटप केलेल्या प्रत्येक संस्थेचे, संघटनेचे आभार मानले.कार्यक्रम समारोपा नंतर आलेल्या सर्व मुस्लिम बांधवाना जेवण्याची वेवस्था कमिटी तर्फे करण्यात आली होती.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मरकजी मिलाद कमिटी चे पदाधिकारी व सदस्य हाजी अहेमद नविवाला,सोफी अली बाबा, अहेमद खान, शेर खान, दाऊद खान, अब्दुल जब्बार रजवि, शे. पाशा, जावेद खान, अब्दुल अझीम सेठ, शे. दस्तगिर,अब्दुल अजीज, वाजीद, मिर्झा शकील आदी नी परिश्रम केले. अशी माहिती मरकजी मीलाद कमिटी चे सेक्रेटरी ऍड. अयुबोद्दीन जागीरदार यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *