
नवीन नांदेड(प्रतिनिधी)-दारु पिऊन कुटूंबाला त्रास देणाऱ्या मोठ्या भावाचा तीन छोट्या भावांनी काटा काढल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला.
जे-3 वैभवनगर हडको येथे सूर्यवंशी कुटूंब राहते. आई-वडील आणि चार भाऊ असे हे कुटूंब आहे. दि.1 ऑक्टोबरच्या रात्री नरेंद्र पांडूरंग सुर्यवंशी हा घरी आला आणि आई-वडीलांना शिव्या देऊ लागला. तेंव्हा दुसरे भाऊ राजेंद्र पांडूरंग सुर्यवंशी (28), सत्येंद्र पाडुरंग सूर्यवंशी (22) आणि सुरेंद्र पांडुरंग सूर्यवंशी या तिघांनी त्यास वाद होण्यापासून रोखले तेंव्हा सत्येंद्रने नरेंद्रच्या डोक्यात लाकुड मारुन त्याला जखमी केले आणि त्यात तो मरण पावला.
इतवारा पोलीस उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक आणि नांदेड ग्रामीणचे अनेक पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार आज पहाटे वैभवनगर हडको येथे गेेले. तेथे त्यांनी योग्य सुचना दिल्या. वृत्तलिहिपर्यंत या प्रकरणाचा गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती.