नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री यांची संयुक्त जयंती जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पुष्पहार अर्पण करून साजरी केली.
2 ऑक्टोबर हा दिवस राष्टपिता महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री यांची जयंती म्हणून साजरी केली जातो. या दिवशी सर्व शासकीय कार्यालयात यांची जयंती साजरी केली जाते. याच अनुशंगाने जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयातही जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पोलीस निरिक्षक नामदेव रिठ्ठे, सहाय्यक पोलीस निरिक्षक तथा जनसंपर्क अधिकारी शिवाजी लष्करे यांच्यासह कार्यालयातील सर्व विभागातील पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार यांची यावेळी उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सुर्यभान कागणे, पोलीस अंमलदार शामका पवार यांनी केले.
पोलीस अधिक्षक कार्यालयात महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्र जयंती साजरी