मुखेड पोलीसांचे जनतेला आवाहन फसवणुकीच्या तक्रारी द्या
नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड येथे महाराष्ट्र अन्नदाता सुविधा केंद्र मार्फत अनेक लोकांकडून 2200 रुपये अनामत रक्कम घेवून त्यांना राशन किट देण्याचे आमिष दाखवणाऱ्या एकाला मुखेड पोलीसांनी पकडल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मुखेड यांनी त्या भामट्याला 6 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
मुखेड शहरात श्री.गोविंदराज ग्रामीण बहुउद्देशिय सेवाभावी संस्था सिडको, नवीन नांदेड यांची नोंदणी महा/160/2014, एफ-20576(नां) अशी नोंदणीकृत संस्था करून त्या मार्फत राजकुमार उर्फ राजू शंकरराव घोडके रा.गायकवाडगल्ली मुखेड यांनी महाराष्ट्र राज्य अन्नदाता सुविधा केंद्रामार्फत 2200 रुपये अनामत रक्कम जमा केल्यानंतर दोन टप्यात राशन किट दिले जाईल अशी जाहिरात केली. या जाहिरातीप्रमाणे 30 किलो गहु, 26 किलो तांदुळ, 10 किलो साखर, 5 लिटर गोडतेल, 5 किलो पोहा, 250 ग्रॅम आंबारी मसाला, 2 किलो मसुरदाळ, 1 किलो दाळवा, 1 किलो शेंगदाने, 5 किलो वॉशिंग पाऊडर, 2 किलो तुरदाळ, 2 किलो चनादाळ असे राशन दोन टप्यात दिले जाईल असे पॉम्पलेट छापले आणि लोकांना आपल्याकडे आकर्षीत करून त्यांचा विश्र्वास संपादन करून त्यांच्याकडून प्रत्येकी 2200 रुपये अशी रक्कम जमा केली.
वेळेत राशन किट मिळाले नाही म्हणून लोक त्यांच्या वारंवार दुकानावर व घरी जात असतांना तो दुकानाला व घराला कुलूप लावून पळून जात होता. 500-600 लोकांचा जमा तेथे जमला असल्याची माहिती मिळाल्याने मुखेडचे पोलीस निरिक्षक रमेश वाघ, पोलीस उपनिरिक्षक गजानन अन्सापुरे हे त्या ठिकाणी गेेले आणि राजकुमार उर्फ राजू शंकरराव घोडकेला ताब्यात घेतले. याप्रकरणी अशोक मारोती बच्चेवार यांच्या तक्ररीवरुन मुखेड पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 406 नुसार गुन्हा क्रमांक 284/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक रमेश वाघ यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक गजानन अन्सापुरे हे करीत आहेत.
मुखेडच पोलीस निरिक्षक रमेश वाघ यांनी जनतेला आवाहन केले आहे की, गोविंदराज बहुउद्देशिय सेवाभावी संस्था यांच्यामार्फत जनतेतील कोणाला 2200 रुपये देवून त्यांना राशन किट न देण्याची फसवणूक झाली असेल तर त्यांच्याकडे असलेल्या पुराव्यांसह पोलीस ठाणे मुखेड येथे संपकर्र् साधावा. पोलीस निरिक्षक वाघ यांचा दुरध्वनी क्रमांक 8308074100 आणि पोलीस उपनिरिक्षक गजानन अन्सापुरे यांचा मोबाईल क्रमांक 9130052032 यावर सुध्दा जनतेने माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
आज पकडेल्या राजकुमार उर्फ राजू शंकरराव घोडके यास मुखेड पोलीसांनी मुखेड न्यायालयात हजर केल्यानंतर घडलेल्या प्रकारातील गांभीर्य लक्षात घेवून न्यायालयाने त्यास 6 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
अन्नदाता सुविधा योजनेअंतर्गत लोकांची फसवणूक करणारा पोलीस कोठडीत