
नांदेड(प्रतिनिधी)-निषेध असो..निषेध असो…हेमंत पाटलांचा निषेध असो अशा शब्दात डॉक्टरांच्या संघटनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
3 ऑक्टोबर रोजी डीन डॉ.शामराव वाकोडे यांना संडासची साफसफाई करायला लावून खासदार हेमंत पाटील यांनी त्या घटनांचे चित्रीकरण व्हायरल केले. त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. पण डॉ.शामराव वाकोडे हे आदिवासी जमातीतील व्यक्ती असल्यामुळे त्यांनी त्यानंतर तक्रार दिली आणि हेमंत पाटलांविरुध्द गुन्हा दाखल झाला. याचा निषेध करण्यासाठी आज आयएमए, निमा व इतर डॉक्टर संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

याप्रसंगी बोलतांना डॉ.रेखा चव्हाण सांगत होत्या. काल घडलेल्या निच प्रकाराचा निमा संघटनेच्यावतीने निषेध व्यक्त करते. सोबतच हा प्रकार म्हणजे चोर सोडून सन्यासाला फाशी असल्याचे सांगितले. सफाईचे काम डॉक्टरांचे निसून लोकप्रतिनिधींचे असते असे सांगितले. राजकीय व्यक्तीने कालच्या घटनेचे केलेले राजकारण चुकीचे असल्याने हेमंत पाटलांचा निषध करते. हेमंत पाटलाने याबाबत जाहीर माफी मागावी आणि स्वत: साफसफाई करून या घटनेचे प्रायश्चीत करावे असे बोलत असतांना जमावातील लोक त्याला येथे बोलवा असे सांगत होते.

याप्रसंगी बोलतांना एक विद्यार्थी डॉक्टर म्हणाले की, आमच्या पालकाची ही अवस्था लोकप्रतिनिधींनी केल्याचे पाहुन यापुढे मी कोणालाही डॉक्टर हो असे म्हणार नाही तेंव्हा जमावातील दुसरे डॉक्टर सांगत होते की, आमदार, खासदार किंवा सफाई कामगार हो असे सांग. आम्ही ज्या व्यक्तीकडे आदराने पाहतो ते आमचे गुरू आहेत, माय-बाप आहेत, आमच्यासाठी मार्गदर्शक आहेत त्यांच्या मार्गदर्शनानेच आमच्या जीवनाची प्रगती होणार आहे अशा व्यक्तीबद्दल घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही दाखवलेली एकजुट कायम ठेवून आमच्यासमोर येणाऱ्या व्यक्तीसोबत असाच लढा सुरू ठेवून.

याप्रसंगी डॉक्टरांनी सांगितले की, राजकीय व्यक्ती म्हणून हेमंत पाटीलने केलेला प्रकार निषेधार्य आहेच. आम्ही आज सुरू केलेले आंदोलन कायद्याची प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत आणि सोबतच त्यांच्या पक्षाने त्यांची हकलापट्टी करेपर्यंत सुरूच ठेवणार आहोत. हे डॉक्टरांचे आंदोलन शांततेत व्हावे म्हणून वजिराबादचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवराज जमदडे, दत्तात्रय मंठाळे, पोलीस उपनिरिक्षक रमेश खाडे यांच्या नेतृत्वात अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी मेहनत घेतली.