नांदेड(प्रतिनिधी)-वैद्यकीय महाविद्यालयाच्या 61 वर्षीय अनुसूचित जमातीच्या अधिष्ठात्याला बाथरुम साफ करायला लावून खा.हेमंत पाटीलने आपल्यावर गुन्हा नोंदवून घेतला. नांदेडमध्ये घडलेले मृत्यूचे तांडव आणि त् यावर सुरू असलेली चर्चा यावरचे जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी असे करून घेतले नसेल का?
दि.03 ऑक्टोबर रोजी सन्माननिय चार जिल्ह्यांचे खासदार हेमंत पाटील आपल्या काही समर्थकांसह आपल्या स्वत:चा छायाचित्रकार घेवून नांदेडच्या डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात गेले होते. हेमंत पाटीलचे हे शेवटचे वर्ष आहे. या चार वर्षात त्यांनी शासकीय रुग्णालयात जावून रुग्णांची, तेथील परिस्थितीची, कधी पाहिली काय? नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचा वणवा लागला आणि त्यानंतर नेत्यांनी नांदेडचे शासकीय महाविद्यालय पर्यटनस्थळ बनवले.
हुकूशाहीच्या नावांचा उल्लेख होतो तेंव्हा हिटलर, मुसोलिनी, खोमीनी, झार आदींचा उल्लेख आठवतो. त्या दिवशी अर्थात 3 ऑक्टोबर रोजी भारताच्या संसदेत चार जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या हेमंत पाटीलने 12.30 वाजता आपल्या काही समर्थकांसह, स्वस्तच्या छायाचित्रकारासह आणि काही पत्रकारांसह प्रवेश केला. त्यांनी थेट कोणतीही सुचना न देता अधिष्ठाता डॉ.शामराव रामजी वाकोडे (61) यांच्या कक्षात थेट प्रवेश केला आणि खुर्चीवरून उठण्याचा आदेश दिला आणि स्वत:च्या खुर्चीवर बसले हे बेकायदेशीर कृत्य आहे. त्यामुळे माझा व माझ्या पदाचा अपमान झाला आहे. कॅबीनमध्ये त्यांचे सहकारी मला जोरजोरात बोलून माझ्या शासकीय कामात अडथळा केला. ज्या रुग्णांचा मृत्यू झाला. ते वार्ड पाहायचे असे सांगून मला सोबत नेले आणि माझ्या कार्यालयाबाहेर बाथरुम किंवा संडास कोठे आहे असे सांगून मला शौचालय दाखविण्यास सांगितले. मी त्या प्रमाणे शौचालय दाखवले.ते हे शौचालय तुम्ही साफ करा असे मला सांगितले. त्यावेळी माझ्या कार्यालयातील वर्ग-4 च्या कर्मचाऱ्यांनी पुढे येऊन आम्ही साफ करतो असे म्हणाले. त्यांना पुढे न येवू देता तेंव्हा तुझ्या साहेबाला असे काम करायला पाहिजे. ते फुकट पगार घेतात काय? त्यांनीच हे साफ-सफाई केली पाहिजे असे धमकावून मला जबरदस्तीने शौचालय साफ करायला लावले. त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि मिडीयाने आणि प्रेसवाल्यांकडून ते चित्रीकरण करायला लावले. त्यामुळे माझी मानहाणी झाली आहे. सर्व प्रसार माध्यमांमधून ही बातमी प्रसारीत पण केली. त्यामुळे माझी स्वत:ची आणि माझ्या कुटूंबाची समाजात बेअबु्र झाली आहे. या शासकीय रुग्णालयात एससी, एसटीचे अधिकारी त्यांचे औकात नसतांना येत आहेत यापर्वुी सुध्दा वाकोडे नावाच्या एससीच्या डॉक्टराला सुध्दा असेच काम करायला लावले होते. हे मागासवर्गीय डॉक्टर माजले आहेत. एकंदरीत हे अपराध जातीय तेढ निर्माण करण्याची भावना आहे. वार्ड क्रमांक 6 मध्ये मला नेऊन तेथे सुध्दा मला साफसफाई करायला लावली.
त्यानंतर मला शारिरीक त्रास पण होवू लागला.माझा रक्तदाब वाढला. आरोग्य मंत्र्यांचा दौरा असल्याने मला थोडा उशीर ही तक्रार देण्यासाठी झाला असे तक्रारीत लिहिले आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी या तक्रारीवरुन भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 506, 500, 34 आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 च्या कलम 3(1)(आर), 3(1)(एस), 3(1)(एम), 3(1)(यु),3(2)(व्ही.ए.) आणि महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा सुविधा (हिंसक कृत्य व मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध) अधिनियम 2010 च्या कलम 4 नुसार गुन्हा क्रमांक 703/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास एफआयआरमध्ये लिहिल्याप्रमाणे पोलीस उपनिरिक्षक विजय पाटील यांच्याकडे दिला असे दाखवले आहे. पण या गुन्ह्यात ऍट्रॉसिटीची कलमे असल्यामुळे या गुन्ह्याचा तपास इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्याकडे पाठवावा लागेल. नाईक यांनी सुध्दा हा गुन्हा घडला असल्याचे सांगितले.
डॉ.वाकोडेचे छायाचित्र आणि व्हिडीओ प्रसिध्द झाल्याबरोबर काही मिनिटांमध्ये शितल भवरे या सामाजिक कार्यकर्त्या यांनी आपल्या फेसबुक माध्यमावरून डॉ.वाकोडे हे आदिवासी जातीचे असल्यानेच हेमंत पाटीलने हे कृत्य त्यांच्याकडून करायला लावले अशी पोस्ट प्रसिध्द केली. त्यावर अनेकांनी निषेधाच्या प्रतिक्रिया दिल्या. गुन्हा तर रात्री 11 वाजता दाखल झाला.
हेमंत पाटील संसदेचे सदस्य आहेत. त्यामुळे याबाबतची सविस्तर माहिती सर्वात प्रथम लोकसभा अध्यक्षांना पोलीसांनी द्यायची असते. सर्वसामान्य नागरीकासोबत ज्या पध्दतीने पोलीस आरोपी म्हणून वागतात तसेच या प्रकरणात होईल काय ? हा पाहणारा प्रसंग असेल.
