नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने सप्टेंबर महिन्यात वेगवेळ्या तारखेला वेगवेगळे खाजगी करणाचे निर्णय घेवून तसा शासन आदेश निर्गमित केला. या खाजगीकरणाच्या विरोधात दि.6 रोज शुक्रवारी विद्यार्थी आणि बेरोजगार युवकांकडून विरोधी कृती समितीच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती विरोधी कृती समितीच्यावतीने पत्रकार परिषदेत दिली.
राज्य शासनाने 6 सप्टेंबर 2023 रोेजी कंत्राटी पदभर्ती संदर्भातील शासन निर्णय काढला असून हा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा.याच बरोबर राज्यातील 62 हजार शाळा खाजगी करण आणि बंद करण्याचा निर्णय हाही रद्द करण्यात यावा, सरकारी कर्मचाऱ्यांची 3 लाख पदे त्वरीत भरावी, प्राध्यापक भरती केंद्रीय पध्दतीने करावी, रिक्त असणाऱ्या शिक्षकांच्या जागा त्वरीत भराव्यात यासह विविध मागण्या घेवून विरोधी कृती समिती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. उडीसासारखे राज्य कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम स्वरुपी सामावून घेते पण आपल महाराष्ट्र राज्य भांडवलदारांमार्फत पदभरती करत आहे. मागील अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग हा स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून विविध पदांच्या नोकरीची तयारी करत असून शासनाने खाजगी करणाच्या माध्यमातून ही पदे कंत्राटी स्वरुपात भरली जात असल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारीची संख्या निर्माण झाली आहे. खाजगीकरण रद्द करावे या मागणीसाठी विरोधी कृती समितीच्यावतीने दि.6 ऑक्टोबर रोजी महात्मा फुले पुतळ्यापासून हा मोर्चा काढला जाणार असून ते जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आपला भावना सरकारपर्यंत पोहचविल्या जाणार आहेत.
खाजगीकरणाच्या विरोधात आज विरोधी कृती समितीचा मोर्चा