
नांदेड(प्रतिनिधी)-गुरूद्वारा बोर्डाचे पुर्व प्रशासक डॉ.पी.एस.पसरीचा यांनी घेतलेले चुकीचे निर्णय रद्द करण्यासाठी सध्याचे प्रशासक डॉ.विजय सतबिरसिंघ यांना निवेदन देण्यात आले आहे.
नांदेड येथील सरदार जगदीपसिंघ मोहनसिंघ नंबरदार यांनी दिलेल्या निवेदनानुसार माजी प्रशासक डॉ.पी.एस.पसरीचा यांनी बेकायदेशीरपणे कोट्यावधी रुपयांच्या निविदा दिलेल्या आहेत. त्याचे उदाहरण लिहितांना निवेदनात लिहिले आहे की, गुरूद्वारा बोर्डाच्या यात्रेनिवासांमध्ये साफसफाई ठेवण्यासाठी दर महिला 6 लाख रुपये खर्च येत होतो. पसरिचा यांनी निविदा काढून 22 लाख रुपये दर महाप्रमाणे तीन वर्षाासाठी बी.व्ही.जी.पुणे आणि ओमसाई कंपनी नांदेड यांना ही निविदा दिलेली आहे. गोविंदबाग गार्डन फाऊंटेन टेंडर, गुरुद्वारा गेट क्रमांक 2 समोर पार्किंग टेंडर यावर कोट्यावधी रुपये बरबाद केले आहेत. रिट याचिका क्रमांक 10553/2022 मध्ये उच्च न्यायालयाने डॉ.परविंदरसिंघ पसरीचा यांना कोणताही आर्थिक निर्णय घेण्यासाठी बंदी लावली असतांना सुध्दा अबचलनगर कॉलनीच्या पाठीमागील दुकाने तयार करण्याची निविदा काढून गुत्तेदारांना काम दिले.
मागील गुरुद्वारा बोर्डामध्ये अखंड पाठ साहिबजींच्या पाठांमधील घोटाळा, त्यात वेगवेगळ्या लोकांना बदलून निलंबित असलेल्यांना नियुक्ती दिली. त्यांना दरमहा 50 हजार रुपये पगारी आहेत. नियमबाह्य पदोन्नत्या दिल्या. रविंद्रसिंघ बुंगई यांचे स्विसहाय्यक असलेल्या व्यक्तीला गुरुद्वारा बोर्डाचे अधिक्षक बनवले. सचखंड पब्लिक स्कुलमध्ये अनिलकौर खालसा या महिलेला उपप्राचार्य पदावरून प्राचार्य पदावर नियुक्ती दिली. त्यांची शैक्षणिक अर्हता एमएड प्रथम वर्ष अशी आहे. त्यांनी परिक्षा देतांना गुरुद्वारा बोर्डाची परवानगी घेतली होती काय? अशा वेगवेगळ्या मागण्यांसह या निवेदनात सध्याचे प्रशासक डॉ.विजय सतबिरसिंघ यांच्याकडे पुर्व प्रशासक डॉ.परविंदरसिंघ पसरीचा यांनी घेतलेले सर्व निर्णय रद्द करण्याची मागणी केलेली आहे.

