नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या घरच्या जाचाला कंटाळून काळेश्र्वर घाटाकडे पळत जाणाऱ्या एका महिलेची पोलीस उपनिरिक्षक प्रियंका आघाव आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी विचारणा केली असता ती जीव द्यायला जात होती.पोलीसांनी मात्र तिची समजूत काढून तिला आपल्या भावांसोबत घरी पाठवून दिले आहे.
पोलीस उपनिरिक्षक प्रियंका आघाव त्यांच्या सहकारी महिला पोलीस अंमलदार नलगोंडे आणि उर्वरते हे गस्त करत असतांना काळेश्र्वर घाटाकडे जात होते. कारण दोन दिवसांपुर्वी या घाटावर एका महिलेने आपला जीव दिला होता. पोलीसांची गाडी घाटाकडे जात असतांना 30 वर्षीय महिला रडत कोणाला तरी फोनवर बोलत होती आणि घाटाकडे पळत होती. पोलीस उपनिरिक्षक प्रियंका आघाव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तिला थांबवून तिची विचारणा केली असता घरातील जाचाला कंटाळून त्यांनी जिवदेण्याचा निर्णय घेतला होता आणि म्हणूनच त्या काळेश्र्वर घाटाकडे पळत होत्या. प्रियंका आघाव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तिची समजूत काढली आणि ती बोलतांना शेवटचा फोन कोणाला केला होता हे पाहुन प्रियंका आघाव यांनी त्या व्यक्तीला फोन केला तो व्यक्ती त्या महिलेचा भाऊ होता. एक छोटीशी मुलगी असतांना त्या महिलेने जिव देण्याचा निर्णय घेतला हा नक्कीच काही तरी भयंकार प्रकार असेल ही बाब प्रियंका आघाव यांच्या लक्षात आली. त्यांनी तिच्या भावाला बोलावून घेतले आणि त्यांच्यासोबत त्या महिलेला सुखरूप घरी पाठवून दिले.
पोलीस उपनिरिक्षक प्रियंका आघाव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिव देण्यासाठी जाणाऱ्या महिलेचे वाचवले प्राण