राजनगरमध्ये एका व्यक्तीवर चार जणांनी केला जिवघेणा हल्ला

नांदेड (प्रतिनिधी)- राजनगर येथे चार जणांनी एका चाळीस वर्षीय व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार 3 ऑक्टोबरच्या रात्री घडला आहे. त्यातील दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दीपक वामन जाधव (40) यांनी दिलेल्या तक्ररीनुसार ते राजनगर भागात राहतात. दि. 3 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 10 वाजेच्या सुमारास ते आपल्या घराजवळ असताना सुरेश मानफडे, अनिल सुरेश मानफडे, सुनील सुरेश मानफडे या तिघाभावांसह एक अनोळखी ऑटो रिक्षाचालक ज्याचे नाव माहित नाही, या चौघांनी आमच्याविरूद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा का दाखल केला असे बोलत तलवारीच्या सहाय्याने त्यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. जीवे मारण्याच्या उद्देशाने डाव्या खांद्यावर मारून गंभीर जखमी केले. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी या तक्रारीनुसार भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 504, 506, 34, भारतीय हत्यार कायद्याचे 4/25 नुसार गुन्हा क्र. 307 दाखल केला असून गुन्ह्याचा तपास मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे यांच्याकडे देण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी सुरेश मानफडे आणि त्यांचा मुलगा सुनिल सुरेश मानफडे हे शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *