नांदेड (प्रतिनिधी)- रामतीर्थ पोलिसांनी आपल्या हद्दीत चालणारा तिरर्ट जुगार पकडला असून त्यात 5 हजार रूपये रोख रक्कम आणि तीन मोटारसायकलींसह 77 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
रामतीर्थचे पोलीस अंमलदार अनिल रिंदकवाले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि. 4 ऑक्टोबरच्या रात्री 10.30 वाजता लोहगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर कॅनॉल रोडपासून माळावर काही जण 52 पत्त्यांतील तिर्रट हा जुगार खेळत होते. पोलिसांनी तेथे छापा मारला तेव्हा अविनाश जगदेवराव चिंचोेले (32), संतोष किशनराव मोडेवार (28) हे दोन जण सापडले. त्यांच्याकडून 5 हजार रूपये रोख, 52 बदकछाप पत्ते आणि तीन मोटारसायकली असा 77 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रामतीर्थ पोलिसांनी या दोघांविरूद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ)नुसार गुन्हा क्र. 179/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार शेख यांच्याकडे देण्यात आला आहे.