
नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मान्यतेनंतर गृह पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांनी एक पत्र जारी केले असून 29 सप्टेंबर रोजी बदली झाल्यानंतर न सोडण्यात आलेल्या पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांची संख्या जोडून त्यांना त्वरीत मुख्यालय येथे हजर होण्यास सांगितले आहे. आज 5 ऑक्टोबर आहे तरी पण या पत्रामधील बरेच जण मुख्यालयात हजर न होता त्याच ठिकाणी कार्यरत आहेत. याचा अर्थ पोलीस अधिक्षकांच्या आदेशाला प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली असे लिहिले तर चुक ठरणार नाही.
दि.29 सप्टेंबर रोजी गृह पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांनी एक पत्र जारी केले असून त्यामध्ये 33 रकाने आहेत आणि त्या रकान्यांपुढे बदली झालेल्या त्या ठिकाणच्या लोकांची संख्या लिहिलेली आहे. या सर्वांची बदली पोलीस मुख्यालय येथे सन 2023 च्या सर्व साधारण बदल्यांमध्ये झाली होती.
पत्रात दाखवलेले आणि मुख्यालयात बदली झालेले लोक पुढील प्रमाणे आहेत. पोलीस ठाणे भाग्यनगर-3,पोलीस ठाणे इतवारा-4, पोलीस ठाणे विमानतळ-3, पोलीस ठाणे शिवाजीनगर-2, पोलीस ठाणे वजिराबाद-1, पोलीस ठाणे धर्माबाद-3, पोलीस ठाणे किनवट-1, पोलीस ठाणे मुदखेड-2, पोलीस ठाणे उमरी-2, पोलीस ठाणे उस्माननगर-2, पोलीस ठाणे अर्धापूर-1, पोलीस ठाणे माळाकोळी-2, पोलीस ठाणे रामतिर्थ-3, पोलीस ठाणे मांडवी-1, पोलीस ठाणे सोनखेड-1, पोलीस ठाणे लिंबगाव-1, पोलीस ठाणे कंधार-3, पोलीस ठाणे कुंडलवाडी-1, पोलीस ठाणे तामसा-1, पोलीस ठाणे देगलूर-1, पोलीस ठाणे मरखेल1, पोलीस ठाणे मुक्रामाबाद-1, पोलीस ठाणे ईस्लापूर-1, पोलीस ठाणे भोकर-1, पोलीस ठाणे हिमायतनगर-1, शहर वाहतुक शाखा-7, जीपीयु-2, मोटार परिवहन विभाग-2, प्रभारी अधिकारी एटीसी-2, जिल्हा विशेष शाखा-1, पोलीस नियंत्रण कक्ष-1, जलद प्रतिसाद पथक-2, आरसीपी पथक-1 असे आहेत.
29 सप्टेंबर रोजी झालेल्या या आदेशानंतर सुध्दा आज 5 ऑक्टोबर रोजी सुध्दा यातील बरेच पोलीस अंमलदार अद्याप मुख्यालयाला आले नाहीत अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. म्हणजेच पोलीस अधिक्षकांचा आदेश त्या-त्या विविध प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांनी केराच्या टोपलीत टाकला आहे असे म्हटले तर चुक ठरणार नाही.
