नांदेड(प्रतिनिधी)-खा.हेमंत पाटील यांनी नांदेडचे अधिष्ठाता डॉ.शाम वाकोडे यांच्यासोबत केलेल्या व्यवहारानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये युवा सेनेने सार्वजनिक शौचालयात हेमंत पाटील यांचा निषेध व्यक्त करतांना मोफत संडास साफ करून मिळेल असे पोस्टर हेमंत पाटील यांच्या फोटो व नावासह लावून त्यावर संपर्क करण्यासाठी मोबाईलनंबर पण लिहिला आहे.
खा.हेमंत पाटील यांनी नांदेडचे अधिष्ठाता डॉ.शाम वाकोडे यांच्यासोबत केलेल्या दुरव्यवहारानंतर आता त्यांच्यावर ड्रोलिंग सुरू झाले आहे. हेमंत पाटील यांनी ज्या डॉ.वाकोडे यांची बेअबु्र केली त्या डॉ.शाम वाकोडे यांचे वय 61 वर्ष आहे. भारतीय संस्कृतीने आपल्यापेक्षा जेष्ठांचा आदर करावा हे शिकवलेले असतांना सुध्दा हेमंत पाटील यांनी हा दुर्देवी प्रकार केला. पुढे डॉ.शाम वाकोडे हे अनुसूचित जमातीचे असल्याने आणखीनच घोळ झाला. त्याही नंतर हेमंत पाटील यांनी मी हे काही पहिल्यांदा केले नाही असे सांगून मीच कसा हुशार हे दाखविण्याचा प्रयत्न केला.
हेमंत पाटील यांच्या नांदेडकृतीचे पडसाद छत्रपती संभाजीनगर येथेही उमटले. तेथे युवा सेनेने काही घाण असलेल्या सार्वजनिक शौचालयांमध्ये एक पोस्टर लावलेले आहे. ज्यामध्ये मोफत संडास साफ करून मिळेल असे शब्द लिहिले आहेत आणि त्यावर खा.हेमंत पाटील यांचा फोटो प्रकाशित करून संडास साफ करण्यासाठी संपर्क हेमंत पाटील असे लिहुन त्यावर त्यांचा मोबाईल क्रमांक लिहिलेला आहे. हेमंत पाटलांच करायच काय खाली मुंडक वर पाय अशा घोषणा दिल्या.
जगातील कोणाच्या घरी जुळी बालके जन्मली तरी त्यात मोठा आणि लहान असा फरक फक्त काही सेकंदांमुळे मिळतो. अशा संस्कृतीत 61 वर्षीय डॉ.शाम वाकोडे यांच्याविरुध्द हेमंत पाटील यांनी केलेली कृती सर्मथनिय होवूच शकत नाही. अशा परिस्थिती असे घडलेले प्रकार समाजाची पातळी किती खाली घेवून जात आहे. ही घटना दुर्देवी आहे.