नांदेड- येथील डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे अनेक लोक मृत्युमुखी पडले. दोषी कोण व दोषींना शिक्षा देण्याची साठी प्रत्येक जण आप आपल्यापरीने आम्ही जनतेचे खरे से हितचिंतक दर्शविण्याची शर्यतच लागल्याचे दिसून येत आहे. परंतु सध्या नांदेडच्या भौगोलिक परिस्थिती व लोकसंख्येच्या आणि पूर्वीच्या काळातील वैद्यकीय सुविधा व साधने या वर ही नजर टाकणे जरूरीचे असल्याचे जाणवते.
पूर्वीच्या काळात लोकांच्या संख्येच्या व उपलब्ध सोयी पाहुन अपुऱ्या जागे मुळे ऋग्णानां त्रास होऊ नये हा दृष्टिकोन ठेवून सचखंड गुरूद्वारा बोर्ड द्वारा शहरातील आपली अनमोल जागा शासकीय दवाखान्यासाठी देण्यात आली व त्यांच्या बदल्यात फक्त श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांचे नावाची मागणी करण्यात आली होती. हा दवाखाना सर्वांच्या हाकेच्या अंतरावर असल्याने, रात्री बे रात्री गंभीर पेशंट घेऊन गेल्यास चांगले उपचार होऊन लोकांचे स्वास्थ्य चांगले होत होते.
परंतु पुढे श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या नावाने जी जागा ज्या उद्देशाने दिली गेली होती ते नाव अलिप्त ठेऊन तो उद्देश बाजूला सारून शहरापासून दूर डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले. हा दवाखाना शहरातील प्रत्येक नागरिकाला रात्री बे-रात्री तर सोडाच दिवसात ही जाणे एक त्रासदायक बाब ठरलेली आहे. आर्थिक असो अथवा वेळेच्या हिशोबाने असुविधा निर्माण करणारी ठरली असल्याचे दिसते.
याच्या व्यतिरिक्त नांदेडमध्ये इतवारामध्ये भव्य सर्व सुविधा युक्त आयुर्वेदिक दवाखाना, वजिराबाद येथील आयुर्वेदिक दवाखाना, शामनगर येथील दवाखाना, तसेच महानगरपालिका तर्फे छोटे छोटे दवाखाने उपलब्ध होते.याच्या सोबत गुरूद्वारा बोर्ड व लंगर साहीब तर्फे ही वैद्यकीय सेवा नियमित रुपाने सुरू आहे.याच्या व्यतिरिक्त प्रत्येक तालुक्यात दवाखाने सुरळीत पणे आपली सेवा देताना दिसत होते. सध्या तालुका पातळीवर ची दवाखान्याची अवस्था काय आहे ही कल्पना नाही.
या सर्व सुविधा सोबत थोड्या थोड्या दिवसात शाळेत, गल्लोगल्ली शासनाद्वारे आरोग्य विषयक शिबिरे लसीकरण केले जात होते ही बाब केव्हा बंद पडली कळालेच नाही.पूर्वीच्या काळात डॉक्टरांना देवाच्या नंतर आदराचे स्थान होते. कारण त्या काळी फक्त सेवा देण्याच्या उद्देशाने डॉक्टर आपली सेवा देत होते. परंतु सध्याची परिस्थिती एकदम बदलून गेल्याची दिसते. काही निवडक डॉक्टर्स सोडले तर बाकी सर्व डॉक्टरांनी केवळ पैसा कमविणे हाच मुख्य हेतू ठेवून फार मोठ मोठाले दवाखाने सुरू केलेले आहेत. जो पर्यंत रुग्ण पैसे खर्च करण्यात समर्थ असतो तो पर्यंत तपासणीच्या नावाने हजारो रुपये खर्च करून घेणारे बहुतांश डॉक्टर नजरेत पडत आहेत. रुग्णांकडून आपल्या हिशोबाने पैसे उकळल्यावर नंतर रुग्णाला हैदराबाद, औरंगाबाद, मुंबई, पुण्याला नेण्याचा सल्ला देणारे अनेक डॉक्टर नजरेत पडत आहेत.
जी व्यक्ती आपल्या रुग्णाला मोठ्या शहरात नेण्यात असमर्थ असतात अशांना शासकीय दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला जातो. याकडे ही दुर्लक्ष करून चालणार नाही. अशा गंभीर रुग्णाला शासकीय दवाखान्यातील काही डॉक्टर्स वगळता सर्व डॉक्टर्सनी प्रयत्न करून लोकांचे जीव वाचवण्यात यश प्राप्त केल्याचे ऐकावयास मिळते.नांदेड मध्ये जी घटना घडली त्या बाबतीत कोण दोषी व दोषींना शिक्षा देऊन गेलेले प्राण परत आणता येणार नाही. तर भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून नांदेडच्या लोकसंख्या, नांदेड शहराचे वाढलेल्या क्षेत्रफळ लक्षात घेऊन, बाहेर जिल्ह्यातील व राज्यातील येणाऱ्या रुग्णांचीं संख्या पाहता, जाण्यायेण्याच्या सोयी सुविधा पाहता, नांदेड शहरातील श्री गुरु गोबिंदसिंघजी शासकीय रुग्णालय पुर्वी प्रमाणे, खाटाची संख्या व वैद्यकीय सुविधा, कर्मचारी, डॉक्टर्स संख्या वाढवून सोबत इतवारा येथील आयुर्वेदिक रुग्नालय, महानगरपालिचे दवाखाने येथे सर्व सुविधा सोबत चालु केल्यास अशा घटनांना आळा बसेल असे माझे वैयक्तिक मत आहे.
मी आरोप प्रत्यारोप करण्याच्या विचारांचा नसुन फक्त योग्य ती सुधारणा करून लोकांच्या आरोग्याच्या समस्या योग्य मार्गी लावण्याच्या उद्देशाने हा लिहीण्याचा खटाटोप केला आहे.
-राजेंद्रसिंघ नौनिहालसिंघ शाहू
इलेक्ट्रिकल ट्रैनंर अबचलनगर सेक्टर नं 1 नांदेड
मो.नं.7700063999
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व मृत्यू तांडव एक आढावा