सहाय्यक पोलीस निरिक्षकाने स्वत:च्या बंदुकीतून गोळी झाडून केली आत्महत्या

सोलापूर येथे त्यांच्या घरी घडला प्रकार
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्याच्या बिलोली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरिक्षक आनंद माळाळे यांनी सोलापूर येथे आपल्या घरी आपल्याच सरकारी बंदुकीतून गोळी झाडून घेवून आत्महत्या केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
मुळ उस्मानाबाद जिल्ह्यातील राहणारे आनंद माळाळे हे एमपीएसी मार्फत पोलीस उपनिरिक्षक परिक्षा उत्तीर्ण झाले. पुढे आपली सेवा करत त्यांनी सहाय्यक पोलीस निरिक्षक ही पदोन्नती मिळवली. सध्या त्यांची नियुक्ती मागील काही वर्षापासून नांदेड जिल्ह्याच्या बिलोली पोलीस ठाण्यात होती.
जवळपास दीड महिन्यापुर्वी त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला होता. तेंव्हा त्यांनी नांदेडमध्ये उपचार घेतले आणि त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिल्यानंतर ते आपल्या घरी गेले. त्यांनी आपले घर सोलापूर शहरात बांधलेले आहे. तेथे आई-वडील, पत्नी आणि मुलगा असे कुटूंब आहे. गेल्या महिन्यापासुन ते घरीच होते. आज दि.7 ऑक्टोबरच्या पहाटे त्यांनी आपल्या सरकारी बंदुकीतून स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजलेले नाही.सोलापूर शहरातील सदर पोलीस ठाण्यातील अधिकारी या घटनेची चौकशी करीत आहेत. माळाळे कुटूंबियांच्या दु:खात वास्तव न्युज लाईव्ह परिवार सुध्दा सहभागी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *