नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदाची निवडणुक बिनविरोध झाली असून यासाठी माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांचा एकमेव अर्ज अध्यक्षपदासाठी आला. आणि निवडणुक अधिकारी म्हणून आदासी प्राधिकृत अधिकारी म्हणून व्ही.आर. देशुख यांनी काम पाहिले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दि.15 सप्टेंबर रोजी माजी आ.वसंतराव चव्हाण यांनी दिल्यानंतर नवीन अध्यक्षपदाच्या निवडीसाठी प्रक्रिया पार पुर्ण केली. यासाठी दि.8 ऑक्टोबर रोजी बॅंकेच्या मध्यवर्ती सभागृहात संचालक मंडळाची सभा बोलावण्यात आली होती. या संचालक मंडळातून एका संचालकाची मंडळ अध्यक्षपदासाठी करण्यात आली. यात बॅंकेचे माजी अध्यक्ष तथा माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांचा एकमेव अध्यक्षपदासाठी अर्ज आ.मोहनअण्णा हंबर्डे, माजी मंत्री डी.पी.सावंत, कॉंगे्रस राज्याचे उपाध्यक्ष तथा माजी आ.अमरनाथ राजूरकर, जि.प.चे माजी सभापती संजय बेळगे यांच्यासह बॅंकेचे सर्व संचालक यांच्या उपस्थितीत माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. एकमेव अर्ज असल्यामुळे त्यांची अध्यक्षपदासाठी निवड झाल्याची घोषणा निवडणुक अधिकारी व्ही.आर. देशमुख यांनी केली.
यावेळी बॅंकेचे माजी अध्यक्ष वसंतराव चव्हाण, उपाध्यक्ष हरीहरराव भोसीकर, सर्वश्री संचालक मोहन पाटील टाकळीकर, गोविंदराव नागेलीकर, माजी आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी सभापती बालासाहेब रावणगावकर, राजेंद्र केशवे, कैलास देशमुख गोरठेकर, दिनकर दहिफळे, बाबूराव कोंडेकर, कैलास देशमुख, शाम कदम, शिवराम लुटे, विजयबाई शिंदे, संगीता पावडे, सविता रामचंद्र मुसळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अजय कदम यांची यावेळी उपस्थिती होती.