आक्षेपार्ह वस्तु तुरूंगात सापडल्याचा आरोप
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा कारागृहात झालेल्या दोन तपासणीनंतर दोन जेलर आणि चार पोलीस शिपाई यांना निलंबित करण्याचे आदेश अपर पोलीस महासंचालक तुरूंग अमिताप गुप्ता यांनी जारी केले आहेत. नांदेडच्या कारागृहात सापडलेल्या अनियमित वस्तु त्याचे कारण आहे असे सांगितले जाते. पण त्या कारणांमध्ये अनेक कैदी मोबाईल पण वापरतात याचा उल्लेख नाही.
एका महिन्यापुर्वी पोलीस उपमहानिरिक्षक दर्जाचे अधिकारी आणि त्यांचे पथक नांदेड कारागृहात आले होते. त्यांनी केलेल्या तपासणीत कारागृहात बंदीत असलेल्या अनेक वस्तु सापडल्या. उदाहणार्थ ब्लेड, गुटखा, तंबाखु आदी याबाबत तपासणी करणाऱ्या पथकाला स्थानिक कारागृहातील अधिकारी आणि शिपायांनी समाधानकारक उत्तरे दिले नाहीत आणि ते पथक परत गेले. पुन्हा पंधरा दिवसात दुसरे एक पथक तपासणीसाठी आले त्यांना सुध्दा अशाच अनियमित वस्तु तेथे सापडल्या. याचा अहवाल त्यांनी अपर पोलीस महासंचालक तुरूंग यांना दिला.
त्यानंतर जवळपास दीड महिन्यानंतर नांदेड येथभल जेलर गट-1 रविंद्र रावे, जेलर गट-2 शिंगाडे आणि पोलीस शिपाई राहुल केशहाळे, जगदीश काकड, शामसुंदर भोले आणि चन्ने अशा सहा जणांना निलंबित केल्याचे आदेश आले आहेत. नांदेड कारागृहात अनेक कैद असे आहेत की त्यांची संपुर्ण गॅंगच तेथे आहे. एकजुट असल्याने कैदी सुध्दा बऱ्याच समस्या तुरूंग अधिकारी आणि तुरूंगातील शिपायांना करतात. या सर्व तपासणीमध्ये ज्या वस्तु सापडल्या त्याबद्दल समाधानकारक उत्तर तुरूंग अधिकाऱ्यांना देता आले नाही. पथकाने कैद्यांशी सुध्दा विचारपुस केली होती असे सांगतात. नांदेड जिल्हा कारागृहातील दोन अधिकारी आणि चार शिपाई निलंबित होण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असेल.
