दोन युवकांशी अनैतिक संबंधातून झालेल्या खून प्रकरणातील मारेकऱ्याला जन्मठेप आणि 20 हजार रुपये रोख दंड 

                   
                  मयत सुरजीतसिंघ 
नांदेड(प्रतिनिधी)-एका महिलेचे दोन युवकासोबत अनैतिक संबंध आल्यानंतर झालेल्या वादातून एका युवकाने दुसऱ्याचा खून केला. या प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी मारेकऱ्याला जन्मठेप आणि 20 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. हा प्रकार सन 2018 मध्ये घडला होता.
या बाबतची सविस्तर माहिती अशी की, एक 21 वर्षीय विवाहितेचा पती एका खून प्रकरणात तुरूंगात गेला. त्यावेळी त्या महिलेला एक सहा महिन्याची मुलगी होती. तुरूंगात आपल्या आरोपी नवऱ्या ती महिला भेटायची तेंव्हा तुरूंगातील तिचा नवरा म्हणाला आता मी खून प्रकरणात जेलमध्ये आहे. आता माझे सुटणे काही खरे नाही म्हणून तु तुझ्या जीवना आधार नवीन प्रकारे शोध आणि आपले जीवन सुखाने जग. यानंतर त्या महिलेचा नातलग मंदिपसिंघ नानकसिंघ काटगर (22) याच्याशी त्या महिलेचे सुत जुळले. पण काही दिवसानंतर मंदिपसिंघ काटगर  तिला मारहाण करू लागला. त्यामुळे त्रासलेल्या या महिलेची ओळख सुरजितसिंघ उर्फ कालू लहेरसिंघ मिलवाले (25) या युवकाची ओळख फेसबुकवर झाली आणि त्या महिलेने सुरजितसिंघ उर्फ कालू सोबत आपले सुत जमवले. मंदिपसिंघ हा सेवादार होता.  त्या महिलेच्या घरी 23 ऑगस्ट 2018 च्या रात्री सुरजितसिंघला पाहिले. तेंव्हा तो आणि त्याचा एक मित्र तलवारी घेवून त्या महिलेच्या घरासमोर उभे राहुन सुरजितसिंघला बाहेर येण्याचे आव्हान देत होते. त्यावेळी सुरजितसिंघने आपला मावस भाऊ लक्कीसिंघ गणपतसिंघ मिलवाले यास कॉल केला आणि त्याला बोलावले. तो आल्यावर त्याने कसे बसे या दोघांना समजून पाठवून दिले. त्यानंतर 23 ऑगस्ट 2018 च्या रात्री 2 वाजेच्या सुमारास झालेले भांडण मिटवून टाकावे म्हणून लक्कीसिंघने मनदिपसिंघला बोलावले. तेथे चर्चा झाली चर्चेची जागा कनकय्या कंपाऊंडसमोरच्या रसवंतीवर होती. माझा अधिकार जास्त आहे असे म्हणून मंदिपसिंघ खुप रागात होता आणि त्याने अचानकच तलवार आणि खंजीरसारख्या तिक्ष्ण हत्याराने  सुरजितसिंघच्या डोक्यावर वार करून त्याचा खून केला. खून करतेवेळेस त्याने पिवळ्या रंगाचा टिशर्ट परिधान केला होता. खून करून त्याने नंतर टी-शर्ट बदलला आणि लाल रंगाचा टी-शर्ट परिधान केला.
त्या दिवशी रात्री गस्त घालणाऱ्या पोलीसांनी मंदिपसिंघ आणि त्याच्या साथीदारांना रस्त्यावर का उभे राहिले या कारणावरून हाकलून दिले होते. त्याच पोलीसांनी नंतर मंदिपसिंघने टी-शर्ट बदलल्याची बाब ओळखली. मंदिपसिंघने रक्ताने माखलेला टी-शर्ट जाळून पुरावा नष्ट केला होता. आणि मी काही केलेच नाही अशा अर्विभावात पुन्हा रस्त्यावर फिरत होता. या प्रकरणी मयत सुरजितसिंघ उर्फ कालूचे मावस भाऊ लक्कीसिंघ गणपतसिंघ मिलवाले यांच्या तक्रारीवरुन वजिराबाद पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 302 आणि 201 आणि भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा क्रमांक 223/2018 दाखल झाला.  या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल बडे यांनी केला. त्यानंतर मंदिपसिंघ नानकसिंघ काटघर विरुध्द न्यायालयात  दोषारोपपत्र दाखल झाले. तो सत्र खटला क्रमांक 173/2018 नुसार सुरू झाला.
खटला सुरू झाल्यानंतर मयत आणि मारेकरी यांच्या दोघांच्या अनैतिक संबंधातील महिला नांदेड सोडून 500 किलो मिटर दुर जाऊन वसली. न्यायालयाने अनेकवेळेस संमस पाठवल्यानंतर सुध्दा ती हजर झाली नाही. पण ती महिलाच या घटनेची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होती. तेंव्हा न्यायालयाने पोलीसांना सांगून अखेर त्या महिलेचा शोध लावला आणि ती महिला ज्या गावात होती त्या गावातील न्यायालयातून व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे तिची साक्ष नोंदवली. या प्रकरणात महिलेचे या दोघांशी अनैतिक संबंध होते. तिघांचे व्हाटसऍप चॅटींग सिध्द करण्यासाठी मोबाईल कंपनीच्या नोडल अधिकाऱ्याची साक्ष झाली. वैज्ञानिक विश्लेषण करणाऱ्या अधिकाऱ्याची साक्ष झाली. त्यांच्यासह न्यायालयान एकूण 17 साक्षीदारांची तपासणी केली. उपलब्ध पुराव्या आधारे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी मारेकरी मनदिपसिंघ नानसिंघ काटगरला भारतीय दंड संहितेच्या कलम 302 प्रमाणे जन्मठेप आणि 10 हजार रुपये रोख दंड, कलम 201 साठी 3 वर्ष सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये रोख दंड आणि भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 4/25 साठी 3 वर्ष सक्तमजुरी आणि 5 हजार रोख दंड अशा शिक्षा ठोठावल्या. या सर्व शिक्षा मंदिपसिंघ काटगरला एकत्रीत भोगायच्या आहेत. या प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड. रणजित देशमुख यांनी काम पाहिले. आरोपी मंदिपसिंघचे वकील ऍड. मिलिंद एकताटे हे होते. वजिराबादचे पोलीस अंमलदार जितेंद्र तरटे यांनी पैरवी अधिकाऱ्याची भुमिका वठवली.
आरोपी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *