नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हाधिकाऱ्यांच्या भिंतीला पाच किडण्या विक्री करायच्या आहेत असे बॅनर पाहुन आज धक्काच बसला. त्यातवर संपर्कासाठी मोबाईल क्रमंाक लिहिलेला आहे. फोन केला तर ती बाई सांगते कर्ज द्यायचे आहे म्हणून पाच किडण्याा विकायच्या आहेत.
जगात काय होईल, कसे होईल, कधी होईल, कोठे होईल याचा काही एक नेम नसतो. आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवर चिटकवलेले एक पोस्टर लक्षवेधक होते. त्यामध्ये पाच किडण्या विकणे आहे असे शब्द लिहिलेले आहेत. संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 8263089813 लिहिलेला आहे. त्या खालोखाल इंग्रजीमध्ये सुध्दा Kidney is to sell असे शब्द लिहुन पुन्हा इंग्रजी अंकांमध्ये सुध्दा मोबाईल क्रमंाक लिहिलेला आहे.
संपर्कासाठी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर कॉल केल्यानंतर एक महिला बोलत होती, तिचे बोलणे ऐकल्यावर असे लिहावे वाटते की, “दुनिया में कितना गम मेरा गम कितना कम है। लोगो का गम देखा तो मै अपना गम भुल गया।’, ती महिला सांगत होती की आम्ही मुदखेड तालुक्यातील वाईवरदड या गावचे रहिवासी असून त्या ठिकाणी 5 ते 7 एकर शेत जमीन आहे. त्या जमीनीत आम्ही फुलांची शेती करत होता आणि कुटूंब सुखी होते. परंतू कोरोना कालखंडाने आमच्या जीवनात मोठा बदल घडवला आणि जवळ असलेली संपत्ती संपल्यानंतर आम्ही सावकाराकडून 2 लाख रुपये कर्ज घेतले. कारण घर चालवणे आवश्यकच होते. त्यामध्ये कोरोना काळ संपल्यानंतर आम्ही त्या सावकाराला पुन्हा शेतीत फुलांची लागवड करून त्यातून येणाऱ्या उत्पन्नाच्या रक्कमेतून 2 लाख पेक्षा जास्त रक्कम परत केली आहे. तरी पण तो सावकार पैसे मागतच आहे. माझा नवरा बाहेर गेला तर तो परत येईल की, नाही याची नेहमी भिती वाटत असे. आज मी, माझे पती आणि माझे लेकरे स्वत:चे गाव, स्वत:ची शेत जमीन सोडून भितीने खुप दुर पळून आलो आहोत. येथे लोकांच्या घरात भांडी धुवून आपल्या कुटूंबाचा उर्दनिर्वाह करत आहे.
ती महिला वास्तव न्युज लाईव्हला सांगत होती की, आजही तो सावकार मागेल तेवढे पैसे मला त्याला द्यायचे आहेत. माझ्या कुटूंबात पाच जण आहे. त्यापैकी ज्यांची किडणी रुग्णाला फिट बसेल ती विकायची आहे आणि त्या पैशातून सावकाराचे पैसे द्यायचे आहेत. वास्तव न्युज लाईव्हने त्यांना सध्या तुम्ही कोठे आहात, सावकाराचे नाव काय आहे असे विचारल्यानंतर त्या म्हणाल्या मी नांदेडला येणार आहे आणि सर्व सविस्तरपणे सांगणार आहे त्यावेळी मला तुम्ही मदत करा असा आर्जव वास्तव न्युज लाईव्हकडे करत होत्या.
वास्तव न्युज लाईव्हने लिहिलेल्या या घटनाक्रमात खरच ना आपले दु:ख किती कमी आहे. आज पाच ते सात एकर जमीनीचे मालक असलेले कुटूंब नांदेडपासून दुर राहुन लोकांच्या घरी मजुरी करत आहेत आणि सावकारांच्या भितीमुळे गाव सोडून पळून गेले आहे. महाराष्ट्रामध्ये सावकारी प्रतिबंधक कायदा आहे. त्या कायद्याची सुध्दा त्या सावकाराला भिती वाटली नाही उलट तो कर्जदारांना मारहाण करत आहे. दिलेल्या रक्कमेपेक्षा जास्त रक्कम अगोदरच वसुल केली आहे. तरी ते कुटूंब आपले गाव सोडून पळून जाण्यास प्रवृत्त झाले आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवर हे लावलेले पोस्टर प्रशासनाने पाहिले की, नाही हे माहित नाही असा हा प्रशासनाचा कारभार सुध्दा आहे. याच गेटमधून जिल्हाधिकारी महोदय सुध्दा आपल्या कार्यालयात जातात.
सावकाराच्या भितीमुळे पाच किडण्या विकण्याची जाहिरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवर