एकता नवरात्र महोत्सवाला 15 ऑक्टोबर पासून सुरुवात ; नवा मोंढा मैदानावर प्रती पंढरपूरची स्थापना होणार 

माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांची पत्रकार परिषदेत माहिती

नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड सह मराठवाड्यातील दुर्गादेवीच्या भाविक भक्तांसाठी पर्वणी ठरणारा एकता नवरात्र महोत्सव दिनांक 15 ऑक्टोबर पासून याही वर्षी नवा मोंढा मैदानावर सुरू होणार आहे. यावर्षीच्या नवरात्र महोत्सवानिमित्त येथे पंढरपूरची प्रतिकृती स्थापना करण्यात आली असून नऊ दिवस विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती एकता नवरात्र महोत्सवाचे आयोजक तथा माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.यावेळी नवल पोकर्णा यांची उपस्थिती होती.
स्थापना जवळपास 50 वर्षांपूर्वी ओमप्रकाश पोकर्णा यांच्या पुढाकारातून एकता गणेश मंडळाच्या माध्यमातुन झाली नंतर 1995 पासून एकता मित्र मंडळ स्थापन होऊन त्याचे रुपांतर एकता नवरात्र महोत्सवात झाली. या मंडळामध्ये 550 कार्यकर्ते कार्यरत आहेत. त्याच प्रमाणे या कार्यक्रमात देवीच्या ज्या मुर्तीची स्थापना होते ती मुर्ती प्रख्यात मुर्तीकार कै.विजयभाऊ खातु मुंबई हे करत होते व आता त्यांची कन्या रेश्मा खातु या मूर्ती तयार करतात . महाराष्ट्रातील सर्वात उंच 15 फुटाची ही मूर्ती आहे. नवरात्र महोत्सवानिमित्त विविध देखावे येथे सादर केले जातात. आतापर्यंत तिरुपती, केदारनाथ, अमरनाथ, शिर्डी, छत्रपती शिवरायांचे दरबार, माँ दुर्गाचे दरबार, लाल महल, वैष्णोदेवी, पद्मनाथ मंदिर, महालक्ष्मी मंदिर वेल्लुर, राम मंदिर, राज पॅलेस, इतर धार्मीक स्थळांची प्रतिकृती स्थापन करून नांदेडच्या भविकाभक्ताना आगळ्यावेगळ्या दर्शनाची संधी उपलब्ध करून दिली जाते. आयोजित दांडीया रास यामध्ये जवळपास 2000 महिला दांडीया खेळतात. त्यांच्या पुर्ण सुरक्षेची काळजी घेतली जाते. त्याच प्रमाणे या सर्व कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण MCN चॅनल वर केले जाते. दररोज जवळपास 15 ते 20 हजार भाविक भक्त दर्शनाला येतात शिवाय दररोज 5 क्विंटल चा प्रसाद वाटप केला जातो.
या कार्यक्रमात येणाऱ्या भाविकांच्या करमणुकीसाठी खास आकर्षन म्हणुन एक्झीबिशन ठेवले आहे. विविध प्रकारचे शिबीरे आयोजीत केली आहेत. रक्तदान शिबीर, मेडीकल कॅम्प, चष्मे वाटप, चप्पल वाटप, अनाथ आश्रम येथे अन्नदन व साडी चोळी वाटप आदि लोकोपयोगी कार्यक्रमही घेतले जाणार आहेत.
याच कार्यक्रमास महीलांच्या मनोरंजनासाठी 9 दिवस, रांगोळी स्पर्धा, संगित खुर्ची, भजन स्पर्धा, वेगवेगळे स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. नवरात्र महोत्सवानिमित्त नवा मोंढा परिसरात रोषणाई करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात 48 टिम सज्ज असून ते विविध जबाबदाऱ्या पार पडणार आहेत . नवरात्र महोत्सवाचा समारोप भव्य अशा अतिषबाजीसह रावण दहणाने करण्यात येईल अशी माहितीही माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी दिली आहे.
यावर्षीचा नवरात्र महोत्सव नांदेडकरांसाठी आगळावेगळा ठरणार असून प्रति पंढरपूरची स्थापना येथे करण्यात येत आहे . त्यामुळे नांदेडच्या देवी भक्तांना माता दुर्गेच्या दर्शनासह पंढरपूरच्या पांडुरंगाची आणि विठ्ठल रखुमाईचेही येथे दर्शन करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती ही श्री पोकर्णा यांनी यावेळी दिली . जास्तीत जास्त भाविक भक्तांनी धार्मिक या नवरात्र महोत्सवाचा आणि धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहनही संयोजकांच्या वतीने माजी नगरसेवक नवल पोकर्णा यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *