नांदेड(प्रतिनिधी)-सोमठाणा ता.कंधार येथील बस स्थानकावर एस.टी.चालक मुंडे यांना दोन केंद्रेंनी मारहाण केली आहे. कंधार पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दि.11 ऑक्टोबरच्या दुपारी 12 वाजेच्यासुमारास ब्रम्हाजी शिवाजी मुंडे हे एस.टी.चालक कंधार-जळकोट-कंधार-पानशेवडी मार्गे आपली शासकीय बस घेवून जात असतांना सोमठाणा ता.कंधार येथे बस थांबलेली असतांना शिवशंकर बाबूराव केेंद्रे आणि बाबूराव शंकर केंद्रे या दोघांनी बस थांब्यावरच गाडी का थांबवली नाहीस असे म्हणून एस.टी.चालकाचे दार उघडून चालक ब्रम्हाजी मुंडे यांना खाली ओढून नालीत टाकून लाथा-बुक्यांनी मारहाण केली. एकाने त्याच्या हातातील लोखंडी कड्याने त्यांच्या डोक्यात गंभीर दुखापत केली. या तक्रारीनुसार कंधार पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 332, 324, 294, 506 आणि 34 नुसार हाडोळी ता.कंधार येथील शिवशंकर केंद्रे आणि बाबुराव केंद्रे यांच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 314/2023 दाखल केला आहे. या गुन्हयाचा तपास पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक मुखेडकर यांच्याकडे देण्यात आला आहे.
एस.टी.चालक मुंडेला दोन केंद्रेंनी केली मारहाण